Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मनोज जरांगे-पाटील मविआ पुरस्कृत आहेत, लक्ष्मण हाकेंचा आरोप, पाहा Video

आगामी निवडणुकांच्या आधी राज्यात जातीय आरक्षणावरून वातावरण तापलेलं आहे. मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांसमोर आले असून दोन्ही समाजाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं दिसत आहे. अशातच मनोज जरांगे हे मविआ पुरस्कृत असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मनोज जरांगे-पाटील मविआ पुरस्कृत आहेत, लक्ष्मण हाकेंचा आरोप, पाहा Video
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 4:33 PM

राज्यात मराठा-ओबीसी समाजामधील वातावरण तापलेलं असल्याचं पाहायला मिळालं आहे. येत्या काळाता विधानसभा निवडणुका असल्याने राजकीय नेते याचा आपापल्या परीने फायदा घेणार अशी लोकांमध्ये जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे हे मविआ पुरस्कृत आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलाय. तर दुसरीकडे भुजबळांच्या शांततेच्या आवाहनामागे पुन्हा दंगलींचा डाव आहे का?अशी शंका जरांगेंनी वर्तवलीय.

स्वतः तलवारीची भाषा करणारे आता शांततेचं आवाहन करुन नवा कट रचतायत का, असा आरोप भुजबळांवर मनोज जरांगेंनी केलाय. काल पवारांची भेट घेत भुजबळांनी राज्यात शांततेसाठी पुढाकाराचं आवाहन केलं. मात्र जरांगेंनी भुजबळांच्या हेतूवर शंका घेत त्यांना लक्ष्य केलंय.

पाहा व्हिडीओ-

दुसरीकडे जरांगेंना महाविकास आघाडीचंच पाठबळ असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय. विशेष म्हणजे याआधी ओबीसी एल्गार सभांमधून भुजबळ जरांगेंवरुन त्यांच्याच सरकारला लक्ष्य करत होते. नंतर आंदोलक नवनाथ वाघमारेंनी जरांगेंना मुख्यमंत्री शिंदेंची रसद असल्याचा आरोप केला. काल वाघमारेंसोबतच उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंनी जरांगेंमागे मविआ असल्याचा दावा केलाय.

सर्वपक्षीय बैठकीआधी सरकारनं किती कुणबीपत्र दिलेत. ओबीसींना धक्का कसा लागणार नाही. याची स्पष्टता द्यावी म्हणून ओबीसी नेत्यांनी मागणी केली. नवनाथ वाघमारेंनी दावा केला की 54 लाख बोगस प्रमाणपत्र दिली गेलीत. तेव्हा सरकारनं दिलेले 54 लाख दाखले हे याआधीच्याच नोंदीनुसार दिले आहेत. मात्र माहितीनुसार नव्यानं दिलेले दाखले हे ४८ हजारच असल्याचं खुद्द गोपीचंद पडळकरांनीच सांगितलं होतं. त्यामुळे सरकारच्या आकडेवारी सत्तेतल्याच नेत्यांचा विश्वास आहे की नाही, असाही प्रश्न विचारला जातोय. दरम्यान स्वतः मंत्रीपदी असलेल्या भुजबळांनी सरकारऐवजी शरद पवारांना आवाहन का केलं. यावरुन कालपासूनच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.