Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : उमेदवारी देतानाही 20-20 कोटी मागतायेत, लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे यांचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणासाठी उपोषण सुरु आहेत. तर, लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण करतायत. मात्र हाकेंनी अचानक मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय. शिंदे, ओबीसी शब्दही उच्चारत नाहीत. तसंच तिकीटासाठी 20-20 कोटींची मागणी केली जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : उमेदवारी देतानाही 20-20 कोटी मागतायेत, लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 10:40 PM

ओबीसी आंदोलक, लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ओबीसी आरक्षणावरुन निशाणा तर साधलाच. पण दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना प्रोटेक्शन देणारे मुख्यमंत्री असून उमेदवारी देतानाही 20-20 कोटी मागत असल्याचा आरोप करुन हाकेंनी खळबळ उडवलीय. जरांगे पाटलांचं 4 दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु आहे. तिथून काही अंतरावरच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ओबीसी बचाव आरक्षणासाठी उपोषण करतायत. मात्र अचानक हाकेंनी, मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका केलीय. ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाट वाटते असं टीकास्त्र हाकेंनी सोडलंय.

पाहा व्हिडीओ:-

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटलांची आहे. जरांगेंच्या याच मागणीला लक्ष्मण हाकेंचा विरोध आहे. आता तर निवडणूकच ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार असं हाके म्हणालेत. हाकेंच्या आरोपांना आणि टीकेला शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाईंनी उत्तर दिलंय..तर, सरकारला मागण्या मान्य न केल्यास इशारे जरांगेंवरही हाकेंनी टीका केली. हाके आणि वाघमारेंच्या उपोषणाला 2 दिवस झालेत. तर चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती बिघडलीय. मात्र उपोषणावर जरांगे ठाम आहेत.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.