Video : Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | जुनी पेन्शन, संपाचा चौथा दिवस राज्यभरात कुठे आणि कसा परिणाम
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस.. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाचा राज्यभरात कुठे आणि कसा परिणाम झाला? पाहुयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस, कुठे बाईक रॅली,तर कुठे मोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. चौथ्या दिवशीही हा संप सुरु […]
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस.. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाचा राज्यभरात कुठे आणि कसा परिणाम झाला? पाहुयात
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस, कुठे बाईक रॅली,तर कुठे मोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. चौथ्या दिवशीही हा संप सुरु असल्यानं शासकीय कामकाज ठप्प झालंय. महाराष्ट्रातील सर्वच धर्मदाय आयुक्तालयातील कर्मचारी संपावर आहेत. मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन केलंय.
बुलढाण्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढलीय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरही सरकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. इकडे राज्यभरात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पण कोल्हापुरात मात्र जुन्या पेन्शनच्या विरोधातच बेरोजगार युवक-युवतींनी मोर्चा काढला.
नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या आंदोलनाला स्थगिती दिलीय. महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी कामावर रुजू झालेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनामुळं आपण कामावर रुजू झाल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय..
जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपविरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. एसटीचा संप कायदेशीर असल्याचं सांगणाऱ्या सदावर्तेंनी राज्य सरकारी कर्मचा-यांचा संप बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय.
कोर्टानं याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीवर सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. संपकऱ्यांनी समितीसमोर मुद्दे मांडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं अनेक ठिकाणी सर्वसामान्यांची कामं खोळंबली आहेत..
चार दिवसांपासून अनेक सेवा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळं सरकार कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करणार का? जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार का? हेच पाहावं लागेल.