झिरवाळ पिता-पुत्राचं राजकारण सध्या सर्वसामान्यांना समजण्यापलीकडे गेलंय. वडिल अजितदादा गटात आहेत., आणि मुलगा शरद पवारांच्या मंचावरुन मविआसोबत आणाबाका घेतोय. वडिल झिरवाळांच्या मते त्यांचा मुलगा आज्ञाधारक आहे., पोरगा मात्र मविआतून लढण्याची इच्छा वर्तवतोय. झिरवाळ म्हणतायत मी कधीच गद्दारी केली नाही.,मात्र मुलाच्या प्रश्नावर आम्ही सांगतो एकीकडे आणि जातो दुसरीकडे असंच आमचं राजकारण असल्याचं झिरवाळ करतायत.
मुलगा म्हणतोय आम्ही शरद पवारांसोबत राहून निष्ठावंत राहिलो. यावर मग अजित पवारांसोबत गेलेले नरहरी झिरवाळ कोण, असा प्रश्न विचारल्यावर ते अजितदादांचे निष्ठावान असल्याचं उत्तर त्यांचे पुत्र देतायत. पहाटेच्या शपथेवेळी नरहरी झिरवाळ अजितदादांसोबत गेले होते. शपथेनंतर झिरवाळांचा पत्ता थेट दिल्लीजवळच्या एका हॉटेलात मिळाला. इकडे अजित पवारांचं सत्तानाट्य संपुष्ठात आल्यानंतर आपलं अपहरण झाल्याचा दावा झिरवाळांनी केला. मात्र आता तो एक बनाव होता, असं झिरवाळ म्हणतायत.
पाहा व्हिडीओ:-
शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याशिवाय आपण हटणार नसल्याचं विधान झिरवाळांनी केलं होतं. 30 दिवसांनी झिरवाळच सर्वात अजित पवारांच्या गटात सामील होण्यास आघाडीवर राहिले. झिरवारांच्या या भूमिकेवर विरोधक सवाल करतायत. मविआसोबत असताना विधानसभा उपाध्यक्ष या नात्यानं शिंदेंचे आमदार अपात्र होणारच असा दावा झिरवाळ करायचे. मात्र अजितदादांसोबत सत्तेत गेल्यानंतर आता आपण सत्तेत आल्यामुळे कसं बोलणार असं झिरवाळ जाहीरपणे म्हणाले.
तूर्तास दिंडोरीत काय घडतं, मुला विरुद्ध वडिलांची लढाई होते. दोघांपैकी एक माघार घेतो की की मग दोन राष्ट्रवादीतल्या लढाईमध्ये झिरवाळ पिता-पुत्रांची चर्चेतली कौटुंबिक युती घरातच उमेदवारी मिळवण्यात यशश्वी ठरते हे पाहणं महत्वाचं असेल.