Tv9 स्पेशल रिपोर्ट : पंतप्रधान मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना ऑफर, नेते पडले बुचकळ्यात

नंदूरबारच्या सभेतून काँग्रेसवर हल्ला करत असतानाच, मोदींनी अचानक शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ऑफर दिली. काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शिंदे आणि अजित दादांसोबत या, असं स्वप्न पूर्ण होतील असं मोदी म्हणालेत. पाहा tv9चा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 स्पेशल रिपोर्ट : पंतप्रधान मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना ऑफर, नेते पडले बुचकळ्यात
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 11:56 PM

नंदूरबारच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दिलीय. 4 जूनच्या नंतर काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या, स्वप्न पूर्ण होतील. असं सांगत मोदींनी पवार आणि ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिली. मोदींनी महाराष्ट्रात येवून ही ऑफर दिलीय.  त्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या 2 दिवसांआधीच्या वक्तव्याचा आधार घेतला. तर ठाकरे आणि शरद पवारांनी मोदींची अस्वस्थता सांगून मोदींची ऑफर धुडकावून लावली.

महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. 3 टप्प्यांचं मतदान झालंय.  2 टप्पे बाकी असताना मोदींनी ठाकरे,पवारांना सोबत येण्याची ऑफर देणं, हे भुवया उंचावणारच आहे. महाराष्ट्रात ठाकरे पवार जोडी भारी पडतेय असं दिसतं का? बहुमतासाठी गरज भासल्यास आतापासूनच मोदींनी तयारी केली का? मोदींना महाराष्ट्रात फक्त भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना हवा का? शरद पवारांना सोबत घेण्याची हीच ती वेळ आहे असं मोदींना वाटतं का? 2 टप्प्यांच्या मतदानावर परिणाम टाकण्यासाठी मोदींची ऑफर आहे का? तर मोदींची ही ऑफर, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांना असल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत. खरं तर, मोदींनी ऑफर आता दिली असली तरी 8 दिवसांआधीच TV9च्या मुलाखतीतून त्यांनी संकेत दिलेच होते. ठाकरेंना मदत करणारा पहिला मीच असेल, असं मोदी म्हणाले होते.

पाहा व्हिडीओ:-

राजकारणात बैठका होत असतात तशा ऑफरही येत असतात. मात्र महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची स्थिती वेगळी आहे. दोघांचेही पक्ष फुटलेत आणि बंड करणारे भाजपसोबत सत्तेत आहेत.त्यामुळं ही निवडणूक विशेषत: पवार आणि ठाकरेंसाठी निर्णायक आहे..आणि या स्थितीत शरद पवार आणि ठाकरेंनी इरादे स्पष्ट करत सोबत येण्यापेक्षा लढण्याचा पर्याय स्वीकारलाय. तर मोदींनी ऑफर दिलेली नसून आपआपल्या मूळ पक्षांसोबत म्हणजेच पवारांनी दादांसोबतआणि ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं, असा सल्ला दिल्याचं फडणवीस म्हणतायत.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.