Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : शिवरायांची माफी मागत, मोदींनी काँग्रेसला घेरलं, पाहा Video
राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन, पंतप्रधान मोदींनी माफी मागितलीय. छत्रपती शिवाजी महाराज, आमचं दैवत असून माफी मागतो, असं मोदी म्हणालेत. त्याचवेळी मोदींनी सावरकरांवरुन काँग्रेसला घेरलं. सावकरांना शिव्या देणारी काँग्रेस माफी मागणार का?,असा हल्लाबोल मोदींनी केला.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुंबईतून माफी मागितलीय. शिवाजी महाराज आराध्य दैवत असून मी त्यांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो, असं मोदी म्हणालेत. गेल्या वर्षी 4 डिसेंबरला, मोदींच्याच हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. मात्र 9 महिन्यांच्या आतच पुतळा कोसळला. याआधी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही माफी मागितली होती. आता वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मुंबईत आलेल्या पंतप्रधानांनीही शिवरायांची माफी मागितली. मात्र, माफी नाही तर सत्तेतून बाहेर पडा, असं महाविकास आघाडीनं म्हटलंय.
एकीकडे मोदींनी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरुन माफी मागितली. तर दुसरीकडे, सावरकरांच्या मुद्द्यावरुन मोदींनी काँग्रेसला घेरलं. सावरकरांना शिव्या देणारी काँग्रेस माफी मागणार का?, असा सवाल मोदींनी केला. इकडे अजित पवार आणि संजय राऊतांनी मालवणच्या राजकोट किल्ल्याला भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी केली. दोषींवर कडक कारवाई करणार असं आश्वासन देत, फरार शिल्पकार जयदीप आपटे पळून पळून कुठं जाणार, असा इशारा अजित पवारांनी दिला. तर संजय राऊतांनी, शिल्पकार आपटेला सुपारी कोणी दिली. काम देणारा आरोपी ठाण्यातला आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं अशी टीका राऊतांनी केली.
पाहा व्हिडीओ:-
पुतळ्याचा बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केलीय. मात्र शिल्पकार आपटे अजूनही फरार आहे. TV9ची टीम जयदीप आपटेच्या घरीही जावून आली. आधी आपटेच्या कल्याणच्या घराला लॉक होता. पण आता आपटेची पत्नी आणि आई घरी आल्यात. मात्र आमची बोलण्याची मनस्थिती नाही, असं आपटेच्या पत्नीनं म्हटलंय.