टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : शरद पवार यांच्यावर सैतान म्हणून खोतांचं टीकास्त्र, भाजपसोबत गेलेल्या अजित पवार गटाची ठोस भूमिका नाही, पाहा Video

सदाभाऊ खोतांनी शरद पवारांचा उल्लेख सैतान म्हणून केला.

टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : शरद पवार यांच्यावर सैतान म्हणून खोतांचं टीकास्त्र, भाजपसोबत गेलेल्या अजित पवार गटाची ठोस भूमिका नाही, पाहा Video
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 3:32 PM

मुंबई : राष्ट्रवादीवर दावा सांगताना ज्या अजित पवार गटानं शरद पवारांना दैवत मानलं, त्याच दैवताला सदाभाऊ खोतांनी सैतान म्हटलंय. यावर अजित पवार गटाकडून बड्या नेत्यांपैकी फक्त तटकरे आणि भुजबळांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यावरुन ज्यांनी पक्षात 40-40 वर्ष काढली, ते ठोस भूमिका का घेत नाहीत, असा सवाल रोहित पवारांनी केलाय.

सदाभाऊ खोतांनी शरद पवारांचा उल्लेख सैतान म्हणून केला आणि त्यानंतर एकेरी शब्दात या सैतानाला गावगाड्यात येऊ देऊ नका असंही विधान केलं. सदाभाऊ खोत हे भाजप समर्थक मानले जातात. अजित पवारांचा गट आता सत्तेत आहे. मात्र सदाभाऊ खोतांविरोधात अजित पवार गटातल्या कोणत्याही बड्या नेत्यानं फक्त निषेधाऐवजी ठोस भूमिका का घेतली नाही, असा सवाल रोहित पवारांनी केलाय.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सोलापूर आणि पुण्यात सदाभाऊ खोतांविरोधात आंदोलनं केली. मात्र अजित पवार गटानं याबद्दल अद्याप कोणतंही आंदोलन केलेलं नाही. विशेष म्हणजे कालपर्यंत सिंचन आणि शिखर बँकेवरुन जे सदाभाऊ खोत अजित पवारांवर टीका करत होते, ते अजित पवार आता भाजपसोबत आल्यानंतर सदाभाऊ खोतांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना क्लिनचीट दिलीय.

अजित पवार गट फुटीनंतर भाजपचे नेतेही शरद पवारांना टार्गेट करु लागले आहेत. 82 वर्षाच्या व्यक्तीला योद्धा का म्हणावं. सैन्यात ८२ व्या वर्षी योद्धा म्हणून घेत नाहीत, अशी टीका नारायण राणेंनी केली. राणेंच्या या टीकेवर छगन भुजबळ उत्तर न देताच निघून गेले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनीही राष्ट्रवादीवर सिंचन आणि शिखर बँक घोटाळ्याचा आरोप केला. मात्र ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच सत्तेत का घेतलं, असा प्रश्न उभा राहिल्यावर मोदींनी केलेले आरोप हे शरद पवारांवर होते, असा दावा मुनगंटीवारांनी केलाय.

पाहा व्हिडीओ :

वर्षभरात झालेल्या शिंदे आणि अजित पवार या दोन बंडांचा घटनाक्रम जवळ-जवळ सारख्याच पद्धतीनं पुढे सरकतोय. शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी अप्रत्यक्षपणे चिन्ह आणि पक्षावर दावा सांगितला. अजित पवार गटानंही पहिल्याच सभेत पक्षावर दावा केला. बंडानंतर शिंदेंनी प्रतोद आणि गटनेत्यांची निवड बदलली अजित पवार गटानंही तेच केलं. शिंदेंच्या बंडाआधीच 2 अपक्षांच्या मदतीनं त्यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. इथं प्रत्यक्ष बंडाआधीच्या 3 दिवस आधीच अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडे बदलांचे पत्र पाठवलं.

शिंदे गटानं बंडानंतर संजय राऊत आणि ठाकरेंच्या अवती-भवतीच्या नेत्यांना टार्गेट केलं. अजित पवार गटानं रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांवर निशाणा साधला. एक रंजक विरोधाभास असाही आहे की पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, हे एक कारण शिंदेंच्या बंडामागे होतं. इकडे मात्र पक्षाच्या अध्यक्षांनी आता घरी बसावं म्हणून अजित पवारांनी नवी चूल मांडलीय.

दुसरा एक विरोधाभास हा आहे की शिंदेंच्या बंडानंतर अनेक दिवसांपर्यंत भाजपनं उद्धव ठाकरेंवर केलेली टीका शिंदे गटाला सहन होत नव्हती. अजित पवार गटानं मात्र पहिल्याच भाषणात शरद पवारांनाच टार्गेट केल्यामुळे भाजप नेते आणि त्यांचे समर्थकांनाही टीकेच्या फैरी सुरु केल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.