video : टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : शिंदे- फडणवीस सरकारवर 10 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
मेट्रोच्या कारशेडवरुन पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना सुरु झालाय. कारण ज्या कांजूरमार्गचा विरोध भाजपनं केला. आता तीच जमीन मेट्रो 6 च्या कारशेडसाठी देण्यात आलीय.
मुंबई : मेट्रोच्या कारशेडवरुन पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना सुरु झालाय. कारण ज्या कांजूरमार्गचा विरोध भाजपनं केला. आता तीच जमीन मेट्रो 6 च्या कारशेडसाठी देण्यात आलीय. त्यावरुन पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सवाल करत, 10 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय.
मुंबईतल्या मेट्रो 6 च्या कारशेडसाठी, कांजूरमार्गमध्ये 15 हेक्टर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि पुन्हा ठाकरे आणि भाजपचे नेते आमनेसामने आलेत. ही तीच जागा, ज्या जागेवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाकरे आणि भाजप आमने सामने आली होती. मेट्रो 3च्या कारशेडसाठी, कांजूरमार्गचा प्रस्ताव ठाकरे सरकारनं दिला होता. त्याला भाजपनं विरोध केला होता. मात्र मेट्रो 6 साठी हीच जागा देण्याचा निर्णय झाल्यानंतर, आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल करत 10 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय.
कांजूरमार्गची जागा, मेट्रो 3च्या कारशेडसाठी योग्य नाही, असा अहवालच असल्याचं फडणवीसही सांगत होते. मात्र आता तीच जमीन मेट्रो 6च्या कारशेडसाठी कशी देण्यात आली असा सवालही आदित्य ठाकरेंनी केलाय. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो 6 ला मार्ग आता मोकळा होणार आहे.
सुप्रीम कोर्टात कांजूरमार्गच्या जागेच्या मालकीवरुन केस सुरु होती. ती केस दावाकर्त्याकडून केस मागे घेण्यात आलीय. मात्र ही जमीन कोणाची आहे, असा सवालही आदित्य ठाकरेंनी केलाय.