Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : शिंदेच्या शिवसेनेकडू स्ट्राईक रेट दाखवत भाजपवर कुरघोडी? पाहा video
लोकसभेच्या विजयावरुन आता शिंदेंच्या शिवसेनेनं आम्हीच मोठे असं म्हटलंय. महायुतीत आमचाच स्ट्राईक रेट जास्त त्यामुळं आम्ही मोठे भाऊ आहोत, असं शिरसाट आणि मंत्री शंभूराज देसाई म्हणालेत. पाहा टीव्ही९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट.
आमचा स्ट्राईक रेट जास्त त्यामुळं आम्हीच मोठे भाऊ, असं आता महायुतीतही सुरु झालंय. लोकसभेच्या निवडणुकीत स्ट्राईक रेटमध्ये आम्हीच पुढे असल्यानं मोठा भाऊ आम्हीच असं आधी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले. त्यानंतर, मंत्री शंभूराज देसाई सुद्धा तेच म्हणतायत.
आता भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिघांचाही स्ट्राईक रेट नेमका किती तेही पाहुयात. भाजपनं 28 जागा लढल्या. त्यापैकी 9 जागा जिंकल्या. 32.14 टक्क्यांचा स्ट्राईकरेट शिंदेंच्या शिवसेनेनं 15 जागा लढून 7 जागा जिंकल्या. 46.66 टक्क्यांचा स्ट्राईकरेट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 4 जागा लढून 1 जागा जिंकली. 25 टक्क्यांचा स्ट्राईक रेट आहे. याच आकड्यांवरुन शिरसाट आणि शंभूराजेंचं म्हणणंय आहे, की भाजपपेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे.
पाहा व्हिडीओ:-
आता स्ट्राईक रेट किंवा मोठ्या भावाचा विषय का निघाला तर, विधानसभेचं जागा वाटप..मोठा भाऊ म्हटलं की, जागा अर्थातच जास्त मिळणार. पण महायुतीतल्या स्टँडिंग आमदारांची स्थिती पाहिली तर आकडे सांगतात की मोठा भाऊ तर 105 आमदारांसह भाजपच आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेचेही 40 आमदार आहेत. हे झालं महायुतीचं..पण महाविकास आघाडीत याआधीच छोटा भाऊ, मोठा भाऊची शाब्दिक लढाई सुरु झालीय. काँग्रेसचे महाविकास आघाडीत 13 खासदार निवडून आले. त्यामुळं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलंय की मोठा भाऊ काँग्रेसचं आहे.
जागा वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात व्हायची आहे. त्यासाठी महाविकास आघाडी असो की महायुती दोघांकडून आम्हीच मोठे भाऊ म्हणून दावे सुरु झालेत. अर्थात आपल्या वाट्याला अधिक जागा याव्यात यासाठीच आतापासून ही कव्हर फायरिंग असावी.