Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | खासदार श्रीकांत शिंदे कल्याण की ठाण्यातून, अदलाबदल होणार?
खासदार श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघाचे 2 टर्मचे खासदार आहेत.मात्र आता जागा वाटपात ज्या पद्धतीनं रस्सीखेच सुरु आहे. त्यावरुन श्रीकांत शिंदे कल्याण लढणार की ठाण्यातून हे पाहणं महत्वाचं आहे.
मुंबई : महायुतीच्या जागा वाटपात काही जागांची अदलाबदल होऊ शकते. ज्या कल्याण आणि ठाण्याकडे लक्ष लागलंय. कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेच खासदार आहेत. त्यामुळं श्रीकांत शिंदे कुठून लढू शकतात. महाराष्ट्रात ज्या हायप्रोफाईल लोकसभेच्या लढती आहेत. त्यात मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत.
श्रीकांत शिंदे कल्याण मधून 2014 मध्ये अडीच लाख आणि 2019मध्ये 3 लाख 44 हजार मतांनी विजयी झालेत. कल्याणवर याआधी भाजपकडून मंत्री रवींद्र चव्हाणांसह आमदार गणपत गायकवाडांनीही दावे केलेले आहेत. जागा वाटपात कल्याण शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्यास ठाणे भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यात श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा कल्याणमधूनच उभे राहतील आणि कल्याण जर भाजपच्या वाट्याला गेल्यास ठाण्यातून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची शक्यता आहे. पण तूर्तास श्रीकांत शिंदे उमेदवारीवरुन उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.
पाहा व्हिडीओ:-
कल्याणमधून जर श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचा सामना ठाकरे गटाचे ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्याशी होऊ शकतो तसंच सुषमा अंधारेंचंही नाव चर्चेत आहे. ठाण्यात श्रीकांत शिंदे आले तर लढत फिक्स असेल…ठाण्यात श्रीकांत शिंदेंचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारेंशी असेल आणि तसं झाल्यास ठाण्यात लोकसभेची टफ फाईट होईल.
2019 मध्ये युतीत राजन विचारेंनी दणदणीत विजय मिळवलाय. राजन विचारेंना 7 लाख 40 हजार 969 मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीकडून आनंद परांजपेंना 3 लाख 28 हजार 824 मतं मिळाली. राजन विचारेंचा तब्बल 4 लाख 12 हजार 145 मतांनी मोठा विजय झाला. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातच कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे..त्यामुळं ही निवडणूक श्रीकांत शिंदेच नाही तर स्वत: मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे.