Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : जास्त खुमखुमी आली का? संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा, पाहा Video

| Updated on: Sep 20, 2024 | 11:22 PM

महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. त्याचवेळी संजय राऊतांनी काँग्रेसची खुमखुमी काढलीय..मोठा भाऊ झाल्यासारखं वाटत असेल तर, भविष्यात कळेल असं संजय राऊतांनी म्हटलंय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : जास्त खुमखुमी आली का? संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा, पाहा Video
Follow us on

संजय राऊतांनी आपल्याच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची खुमखुमी काढली. लोकसभा निवडणुकीच्या स्ट्राईक रेटनुसार महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागा मागत असल्याची माहिती आहे. काही दिवसांआधी काँग्रेस नेते नितीन राऊतांनी काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं होतं. आता राऊतांनी, मोठ्या भावाची खुमखुमी असेल तर भविष्यात काँग्रेसला कळेल असा थेट इशाराच दिला.

संजय राऊत वारंवार आमच्यामुळंच काँग्रेसच्या लोकसभेला जागा वाढल्याचं सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर 48 जागांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेनं 21 जागा लढून 9 जागा जिंकल्या..पण काँग्रेसनं 17 पैकी 13 जागा जिंकल्या. काँग्रेसचा स्ट्राईक रेट तब्बल 76 टक्के तर ठाकरेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट आहे 47 %, ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसपेक्षा 4 जागा कमी लढूनही ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा 4 खासदार अधिक जिंकून आले. मात्र रामटेक, अमरावती आणि कोल्हापूर या 3 आमच्याच जागा काँग्रेसला दिल्याचं सांगून आमच्यामुळंच काँग्रेसच्या 3 जागा वाढल्या असं राऊतांचं म्हणणंय.

खरं तर संजय राऊत आठवडाभराआधी पर्यंत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असा दावा करत होते. स्वत: उद्धव ठाकरेंनीही महाविकास आघाडीत चेहरा घोषित करण्याची मागणी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसमोर केली. मात्र त्यास पवार आणि काँग्रेसनं नकार दिला. त्यातच आता बाळासाहेब थोरातांनी महाविकास आघाडीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असं म्हटलं. त्यामुळं राऊतांनी आपला मोर्चा छोटा भाऊ आणि मोठ्या भावावरुन काँग्रेसच्या दिशेनं वळवला. आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसलाच अधिक जागा मिळतील, असं म्हटलंय.

पाहा व्हिडीओ:-

भाजप सोबत असतानाही संजय राऊत असेच शाब्दिक बाण सोडत होते. आता महाविकास आघाडीत त्यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावलेत. त्यामुळं भाजपच्या दरेकरांनीही राऊतांमुळं मविआतही बिघाडी होईल असा टोला लगावला. महाविकास आघाडीत गेल्या 3 दिवसांपासून जागा वाटपाच्या बैठका सुरु आहेत. त्यात सर्वाधिक जागा लढण्याची स्पर्धा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतच आहे