Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे तीन फॉर्म्युले तयार, पाहा कोणते?
लोकसभा निवडणुकीच्या निकालनंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून मोठा भाऊ कोण याबाबत नेते दावे करताना दिसत आहेत. महायुती आणि मविआमध्ये यावरून वाद होण्याची शक्यता आहे. अशातच मविआचे तीन फॉर्म्युले कोणते झालेत ते पाहा.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्पष्टपणे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मेसेज देण्यात आलाय. लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसला अधिक जागा दिल्या. त्यामुळं विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जास्त जागा मिळाव्यात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या 288 जागांपैकी, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणिशरद पवारांच्या राष्ट्रवादी, या तिघांना समसमान 96 जागांचा फॉर्म्युला चर्चेत आहे.
दुसरा फॉर्म्युला आहे, काँग्रेस 96-100 जागा, ठाकरे गट 96-100 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 90-96 जागाआणि तिसरा फॉर्म्युला आहे, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना प्रत्येकी 100 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा. महाविकास आघाडीचे जेवढेही मित्रपक्ष आहेत, त्यांच्यासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटानं त्यांच्या कोट्यातून जागा सोडायच्या.
पाहा व्हिडीओ:-
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत, काँग्रेस 13 खासदारांसह मोठा पक्ष ठरला. ठाकरे गटानं 23 जागा लढवूनही नऊच जागा जिंकल्या. त्यामुळं मेरिटच्या आधारवर जागा वाटप व्हावं, अशी मागणी पटोलेंची आहे. अर्थात, शनिवारीच महाविकास आघाडीची प्राथमिक चर्चा झालीय. सध्या तिन्ही पक्षांकडून अंतर्गत सर्व्हे आणि उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. त्यानंतर फॉर्म्युला अंतिम करण्याचा प्रयत्न होईल