Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : राष्ट्रवादीसोबत उलट्या, महायुतील तणाव, पाहा Video
राष्ट्रावादीचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेनेत तणाव निर्माण झाल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीसोबत उलटी येते, असं शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत म्हणालेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री तानाजी सावंतांचं, हे वक्तव्य शिंदेंची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला. राष्ट्रवादीशी कधीच जमलं नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसत असलो, तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं तानाजी सावंत म्हणालेत. आता दादांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी थेट, अजित पवारांसमोर सत्तेतून बाहेर पडण्याचाच प्रस्ताव ठेवला. तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनीही, बाहेर पडायचं असेल तर दादांकडे बोला असं प्रत्युत्तर दिलंय.
उमेश पाटलांपाठोपाठ दादांचे दुसरे प्रवक्ते अमोल मिटकरींनी हॅशटॅग मळमळ मंत्री म्हणत, ट्विट केलं. तसंच तानाजी सावंत कसे अजित पवारांचं स्वागत करत होते हे सांगण्यासाठी फोटोही पोस्ट केला. जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात. हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, इतकंच काय आपला भुम परंडा येथील भैरवनाथ साखर कारखान्याचं उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते करु शकतात. दादांकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलू शकतात.
पाहा व्हिडीओ:-
शरद पवारांची साथ सोडून अजित पवार 40-42 आमदारांसह महायुतीत सहभागी झाले. मात्र दादांच्या राष्ट्रवादीची महायुतीतली एंट्री शिंदेंचे मंत्री आणि नेत्यांना रुचलेली दिसत नाही. काही दिवसांआधी, रामदास कदमांनीही दादा थोडं उशीरा आले असते तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया दिली होती..त्यावरुन वाद झाला होता. आता मंत्री तानाजी सावंतांनीच राष्ट्रवादीसोबत उलट्या होत असल्याचं म्हटलंय. स्वत: अजित पवारांनी माध्यमांसमोर बोलणं टाळलं. पण मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तर शिंदेंनी लक्ष घालण्याचं आश्वासन दादांचं दिल्याचं कळतंय.
महायुतीत दादा आणि शिंदेंच्या शिवसेनेत खटके उडत असल्यानं, टीकेची संधी काँग्रेसनंही साधली. महायुती सरकारमध्ये भनायक महाभारत असल्याचं पटोले म्हणालेत. महाविकास आघाडीत अजित पवार अर्थमंत्री असताना, निधी मिळत नसल्याच्या तक्रारी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री करत होते. मात्र शिंदेंच्या बंडानंतर दीड वर्षातच तेच अजित पवार महायुतीतही आले. आता पुन्हा शिंदेंचे मंत्री उलट्या होत असल्याचं सांगतायत.