मुंबई : आजकाल अनेक गोष्टी सोशल मीडियात व्हायरल (Viral Post) होत असतात. मात्र सोशल मीडियावर पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीची विश्वासहर्ता असतेच असे नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट ही पडताळली (Fake Post) समोर येऊ लागले आहेत, त्याबाबत टिव्ही 9 मराठीनेही (Tv9 Marathi) वेळोवेळी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र आत्ता अलिकडेच एक फोटो हा सोशल मीडियात पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. याच्या स्कीनशॉटमध्ये दिसणारा मजकूर हा टिव्ही 9 ची बातमी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न काही भामट्यांकडून करण्यात आला आहे. मात्र अशा व्हायरल गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. या गोष्टींची आधी नीट पडताळणी करून घ्या. आत्ताच्या फोटोत व्हायरल होत असणारा मजकूर हा “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पहिला मोठा निर्णय समृद्धी महामार्ग जोडणारा जालाना नांदेड मार्ग रद्द” असा खोटा आहे.
आमच्या बातम्यांची आधी सत्यता पडताळली जाते. त्यानंतर त्याबाबत अधिकृत माहिती ही दिली जाते. मात्र माध्यमांच्या विश्वासाहर्तेचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न हा अनेक भामट्यांकडून होतो आणि लोकही त्या बातमीवर विश्वास ठेवू लागतात. मात्र अशा पोस्टपासून सावध राहणे गरजचे आहे. तसेच अशा बातम्या व्हायरल करणे हा गंभीर गुन्हाही आहे. अशा खोट्या पोस्ट पसरवणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे.
राज्यातलं नंबर वन मराठी न्यूज चॅनल हे टिव्ही 9 मराठी आहे. साहजिकच टिव्ही 9 मराठी पाहणारा मोठा वर्ग आहे, वेगवान आणि अत्यंत विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी टिव्ही 9 ला तुमचा मिळणारा प्रतिसाद हा आणखी वाढावा यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असू. अशा काही गोष्टी जरी काही चुकीच्या लोकांकडून व्हायरल केल्या गेल्या असल्या तरी अशा बातम्यांबाबतही तुमच्या शंकाचं निरसन हे वेळोवेळी करत राहू.