Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | एमआयएमच्या आंदोलनामुळे शहरातील उद्योजकांनी व्यक्त केली भीती, मुख्यमंत्र्यांना लिहिलंय पत्र!

| Updated on: Mar 12, 2023 | 12:20 AM

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. गटामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केलीय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | एमआयएमच्या आंदोलनामुळे शहरातील उद्योजकांनी व्यक्त केली भीती, मुख्यमंत्र्यांना लिहिलंय पत्र!
Follow us on

मुंबई : औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं केल्यापासून एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. या आंदोलनामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याचा आरोप उद्योजकांनी केलाय. उद्योजकांनी याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिलंय.

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर एमआयएमनं आंदोलन सुरु केलंय. याच आंदोलनामुळं आणि त्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या एका गटामुळं शहराचं वातावरण खराब होत असल्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या उद्योजकांनी पत्र लिहिलंय.

उद्योजकांनी शहराचं वातावरण बिघडत असल्यावरुन सरकारला पत्र लिहिलं असलं तरी जलील मात्र आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी उद्योजकांनाच नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलंय. या उद्योजकांना भाजप नेते भागवत कराड यांची फूस असल्याचा आरोपही जलील यांनी केलाय. नामांतराविरोधात एमआयएमनं आंदोलन सुरु केल्यापासून शहर अस्वस्थ असल्याचा आरोप होतोय.

एमआयएमच्या 3 मार्चला आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला. 4 मार्चला साखळी उपोषणात बिर्याणीवर ताव मारला गेला. 5 मार्चला घोषणा करत रस्त्यात धुडगूस घालण्यात आला. 6 मार्चला चिकलठाणा भागातल्या एका चौकाला औरंगजेबाचं नाव देण्यात आलं. जे पोलिसांनी नंतर हटवलं. 9 मार्चला विनापरवानगी कँडल मार्च काढण्य़ात आला आणि आता येत्या काही दिवसात आणखी कँडल मार्च काढणार असल्याचं एमआयएमनं सांगितलंय.

एमआय़एमच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाची घोषणा करुन त्यात बिर्याणीवर ताव मारला. पण आपण साखळी उपोषणाची घोषणाच केली नसल्याचं म्हणत जलील यांनी यू-टर्न घेतलाय. औरंगाबाद शहराच्या शांततेवरून इम्तियाज जलील आणि उद्योजक यांच्यामध्ये वार प्रतिवार सुरू आहेत. मात्र उद्योजकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या शांततेवर चर्चा सुरु झालीय. या चर्चेनंतर तरी किमान शहरातील शांततेचा प्रश्न निकाली निघावा हीच अपेक्षा सर्वसामान्य करु लागलेयत.