Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | राजकारणाच्या दोन बाजू, सभागृहात एकमेकांवर तुटून पडणाऱ्या नेत्यांचा रंगला गप्पांचा ‘फड’

सभागृहात अनेक मुद्द्यांवरुन वाद होत असले, तरी सभागृहाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगत असलेला संवाद चर्चेत आहे.

Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | राजकारणाच्या दोन बाजू, सभागृहात एकमेकांवर तुटून पडणाऱ्या नेत्यांचा रंगला गप्पांचा 'फड'
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 11:38 PM

मुंबई : सभागृहात अनेक मुद्द्यांवरुन वाद होत असले, तरी सभागृहाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगत असलेला संवाद चर्चेत आहे. या संवादांमध्ये आदित्य ठाकरेंच्या एका मताशी भाजपचे प्रवीण दरेकर सहमत होतायत. तर शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधवांमध्ये गप्पाही रंगतायत.

सभागृहात भलेही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असोत. सत्ताधाऱ्यांकडून बोलू दिलं जात नाही, किंवा विरोधकांकडून सभागृह चालू दिलं जात नसल्याचे आरोप होत असोत. पण सभागृहाबाहेर मात्र खेळीमेळीचं वातावरण आहे.

कुठे अजित पवार चेष्ठेनं शंभुराज देसाईंना धक्का देतायत. कुठे विरोधकांमधले अजितदादा आणि सत्ताधाऱ्यांमधल्या चंद्रकांतदादांचं कुठे आदित्य ठाकरे आणि भाजपच्या प्रवीण दरेकरांमध्ये संवाद रंगलाय. तर कुठे भास्कर जाधव आणि शंभुराज देसाई गप्पा करतायत.

अजित पवारांनी उत्तरं देण्यावरुन सभागृहात शंभुराज देसाईंवर अनेकदा टीका केली. मात्र एकत्रति फोटोसेशनवेळी मस्करीत देसाईंना धक्का दिला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत राहिला. याआधीही जेव्हा उद्धव ठाकरे बोलायला आले. तेव्हा अजित पवारांनी मारलेला डोळ्यानं अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. पण पत्रकार मुलाखतीसाठी उभे होते., त्यांना थांब असं म्हणायच्याऐवजी डोळा मारला गेलं., असं कारण अजित पवारांनी दिलं होतं.

दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि भाजपच्या दरेकरांमध्ये कोणत्या तरी विषयावरुन संवाद सुरु होता. विशेष म्हणजे या चर्चेत आदित्य ठाकरेंच्या मताशी दरेकर सहमतही दिसले. सभागृहात ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे शंभुराज देसाईं अनेकदा आमने-सामने येत असले तरी सभागृहाबाहेर त्यांच्यातही मनसोक्त गप्पा रंगल्या होत्या.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.