Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | ‘…तर दादा पुन्हा मोठा निर्णय घेणार’; बारामतीकर पडले बुचकळ्यात, पाहा व्हिडीओ
बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंनाच पराभूत करुन घरात दादागिरी सिद्ध करण्याचं आवाहनही अजित पवारांसमोर आहे. त्यामुळं दादा उघडपणे सुप्रिया ताईंना आव्हान देत आहेत. लोकसभा निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात अजित दादांचाच उमेदवार असेल आणि विशेषत: बारामतीकडे दादांनी मोर्चा वळवलाय.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं हे वक्तव्य साधंसुधं नाही. बारामतीतून लोकसभा निवडणुकीत मी दिलेला उमेदवार विजयी झाला नाही, तर विधानसभेला उभंच राहणार नाही. माझा प्रपंच आणि उद्योगधंदे आहेत, असा इशाराच दादांनी दिलाय. बारामतीत लोकसभेतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असेल. बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंना पाडून माझा उमेदवार जिंकवा अशा आवाहनासह, दादा थेट इशाराच देत आहेत.
बारामतीच्या मेळाव्यातून अजित पवारांनी काही जण भावनिक प्रचार करतील असं म्हणत काका पवारांकडे बोट दाखवलं होतं. त्यावर बारामतीकर योग्य ती नोंद घेतील असं पवार म्हणालेत. शरद पवारांसोबत बंड पुकारल्यानंतर शरद पवारांची पहिली परीक्षा 2 महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक आहे.
पाहा व्हिडीओ-:
बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंनाच पराभूत करुन घरात दादागिरी सिद्ध करण्याचं आवाहनही अजित पवारांसमोर आहे. त्यामुळं दादा उघडपणे सुप्रिया ताईंना आव्हान देत आहेत. लोकसभा निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात अजित दादांचाच उमेदवार असेल आणि विशेषत: बारामतीकडे दादांनी मोर्चा वळवलाय. मात्र माझा उमेदवार जिंकला नाही तर मग विधानसभेलाही उभाच राहणार नाही, असा इशाराच अजित पवारांनी दिलाय.
शिवसेनेपाठापोठ राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बंड पुकारणाऱ्यांनाच पक्ष आणि चिन्हं मिळालीत. एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण आलं. तर दादांना घड्याळ मिळालं.उद्धव ठाकरे आणि शरद पवार निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात कोर्टात गेलेत. मात्र लोकसभेच्या निवडणुका 2 किंवा 3 मार्चला घोषित होण्याची शक्यता आहे आणि सुप्रीम कोर्टातून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा फैसला 3 मार्चआधी म्हणजे 15 दिवसांत येण्याची शक्यता नाही.
म्हणजेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना नव्या चिन्हावरच निवडणूक लढावं लागेल, तर शरद पवारांनी आपण तयार असल्याचं सांगून दादांना ठणकावलंय. लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीसह 2019मध्ये जिंकलेल्या ठिकाणी काकाचे उमेदवार दादांच्याच उमेदवाराविरुद्ध लढतील आणि इथंच काट्याची टक्कर असेल.