Tv9 स्पेशल रिपोर्ट | “देवेंद्र फडणवीस यांचं मोठं मन, उद्धव ठाकरेंनी माफी मागावी ते माफ करतील”, दादांचा ठाकरेंना माफीचा सल्ला!
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटलं आणि ठाकरे-फडणवीसांमधले संबंध आणखी ताणले गेले. पण आता दादांनी उद्धव ठाकरेंनी माफी मागून, वादावर पडदा टाकण्याचं आवाहन केलंय.
मुंबई : उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटलं आणि ठाकरे-फडणवीसांमधले संबंध आणखी ताणले गेले. पण आता चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंनी माफी मागून, वादावर पडदा टाकण्याचं आवाहन केलंय.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटलं आणि तेव्हापासून राजकारण तापलं. पण आता चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना माफी मागण्याचा सल्ला दिलाय. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची माफी मागावी. फडणवीसांचं मन मोठं आहे. ते माफ करतील. पण जहरी टीका कराल तर सहन करणार नाही.
ठाण्यात रोशनी शिंदेंना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीच्या घटनेनंतर उद्धव ठाकरे विचारपूस करण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यानंतर गृहखात्यावरुन सडकून टीका करताना, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटलं. त्या टीकेला फडणवीसांनीही काडतूसनं उत्तर दिलंय.
दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते आमनेसामने आल्यानंतर, इतर नेत्यांमध्येही फडतूस, काडतूसवरुन लढाई सुरु झाली. उद्धव ठाकरेंनी वापरलेला फडतूस शब्द फडणवीसांच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळं उद्धव ठाकरेंबद्दल मनात आदर नसल्याचंही म्हटलं. त्याचवेळी चंद्रकांत दादा उद्धव ठाकरेंना माफीचाही सल्ला देत आहेत. दुसरीकडे काहीही बोलल्यास सहन करणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिलाय.
उद्धव ठाकरेंच्या माफीनं ठाकरे-फडणवीसांमधले संबंध सुधारतील असं चंद्रकांत पाटलांना वाटतंय. पण उद्धव ठाकरे माफी मागतील असं दिसत नाही.