Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधानसभेआधी उद्या फैसला, कोण फुटणार? जाणून घ्या मतांचं समीकरण

विधानसभेची निवडणूक 5 महिन्यातच आहे..पण कोणता पक्ष फुटणार, कोणाचे आमदार स्वत:च्या पक्षाला साथ देणार नाही हे उद्या स्पष्ट होणार आहे. कारण उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीनं मतदान आहे. तर काँग्रेसचे आमदार गोरंट्याल यांनी काँग्रेसचेच 4 आमदार फुटणार असल्याचा गौप्यस्फोट केलाय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधानसभेआधी उद्या फैसला, कोण फुटणार? जाणून घ्या मतांचं समीकरण
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 9:27 PM

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान अवघ्या काही तासांवर आलंय.11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यानं एकाचा पराभव निश्चित आहे. गुप्त मतदान असल्यानं शरद पवारांची राष्ट्रवादी सोडून सर्वच पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलंय. मात्र मतदानाआधीच काँग्रेसचे 4 आमदार फुटणार, असा गौप्यस्फोट काँग्रेसचेच आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केलाय.

सध्याच्या संख्याबळानुसार काँग्रेसकडे 37 आमदार आहेत. आमदार गोरंट्यालच सांगतायत की काँग्रेसची 4 मतं फुटणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 3 मतांची गरज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसची 3 मतं अजित पवार फोडणार आहेत. महायुतीचे 9 उमेदवार आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत आणि महायुतीलाही 9 वा उमेदवार आणि महाविकास आघाडीला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गरज आहे. त्यामुळं क्रॉस व्होटिंग अटळ आहे.

भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत उमेदवार आहेत. भाजपकडे स्वत:चे 103 आणि अपक्ष 8 असे एकूण 111 मतं आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने उमेदवार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 37 आमदार आणि अपक्ष 6 असे 43 मतं आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जें निवडणुकीच्या रिंगणात आहेत…अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वत:चे 40 आणि इतर 3 असे 43 आमदार आहेत. एकूण महायुतीकडे मतं आहेत, 197. हायुतीचे 9 उमेदवार आहेत. 9 व्या उमेदवारासाठी आणखी 10 मतं हवीत.

महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शेकापचे जयंत पाटील उमेदवार आहेत..आणि याच दोन उमेदवारांमुळं ट्विस्ट आलाय..कारण नार्वेकरांचे सर्वपक्षीय संबंध आहेत. त्यांनी महायुतीच्याही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात. तर शेकापचे जयंत पाटीलही गेम बदलण्यात माहीर आहेत. महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिलेत..काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, काँग्रेसकडे 37 मतं आहेत.. त्यामुळं सातवांचा विजय सहज आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर मैदानात असून ठाकरेंच्या शिवसेनेकडे शंकरराव गडाख या एका अपक्षांसह 16 मतं आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठींबा दिलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि शेकापचा 1 आमदार अशी 13 मतं आहेत. महाविकास आघाडीकडे एकूण मतं आहेत 66 आणि विजयासाठी आवश्यक आहेत आणखी 3 मतं.

पाहा व्हिडीओ:-

महाविकास आघाडीची मतं फुटली नाही तर समाजवादी पार्टीचे 2 आणि माकपच्या एका आमदाराची मदत मिळाल्यास महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार जिंकू शकतात. बविआ, मनसे आणि इतर छोट्या पक्षांची 11 मतं आहेत..त्यामुळं ही मतंही निर्णयाक ठरणार. मात्र महायुतीला 10 मतांची गरज असल्यानं फुटीची शक्यता अधिक आहे. त्यामुळं शेकापचे जयंत पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे, शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भाजपचे सदाभाऊ खोत हे 4 जण अधिक चर्चेत आहेत.आणि महायुतीचे नेते म्हणतायत की, शेकापच्या जयंत पाटलांचीच विकेट जाणार.

शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव होईल, असं भाजपचे नेते सांगत आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल सूचक वक्तव्य केलंय..अधिकची मतं आमच्याच पक्षाकडून मिळतील, असं सांगत दादांचे आमदार फुटतील असे संकेत अप्रत्यक्षपणे दिलेत. 12 पैकी जण पराभूत होणार हे निश्चित आहे. याआधी अडीच वर्षात दोनदा झालेल्या गुप्त मतदानात मतं फुटल्याचा अनुभव आहे. त्यामुळं पुढच्या काही तासात कोणाला झटका बसणार हे स्पष्ट होईल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.