मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी (PMC Bank Scam) आज (गुरुवारी) पहिली अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने (EOW Mumbai Police) पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान (Sarang Wadhwan) आणि राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) यांना अटक केली आहे. हे दोघे एचडीआयएल (HDIL) कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
संबंधित 10 खात्यांपैकी एक खाते सारंग वाधवा यांचे तर दुसरे राकेश वाधवा यांचे खासगी खाते आहे. पोलिसांनी आज दोघांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची जवळपास 3 हजार 500 कोटी रुपयांच्या संपत्तीवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
“पीएमसी बँक घोटाळ्यात आरबीआयच्या अधिकाऱ्यांचाही समावेश”
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने केलेल्या या कारवाईचं किरीट सोमय्या यांनी स्वागत केलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात आरबीआयच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या म्हणाले, “याप्रकरणी आता फसवणूक आणि 420 असे कलम लावले जातील. जॉय थॉमस आणि वार्याम सिंग यांनाही अटक होऊ शकते. मी ईडीला या प्रकरणाची माहिती दिली आहे. पुढची चौकशी ईडी करेल असा मला विश्वास आहे.”
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (PMC Bank) 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. बँकेने (PMC Bank) तसे एसएमएस ग्राहकांना पाठवले आहेत. या मेसेजेसनंतर पीएमसी बँकेबाहेर ग्राहकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत. सुरुवातीला आरबीआयने ग्राहकांना महिन्यातून केवळ 1 हजार रुपये काढण्याचे निर्बंध लादले होते. मात्र, ग्राहकांचा असंतोष पाहता ही मर्यादा वाढवून 6 महिन्यात 10 हजारांवर नेली. हे 10 हजार एकावेळी काढू शकता किंवा टप्प्याटप्प्यानी काढू शकता. पण 6 महिन्यातून केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील. मात्र, तरिही दैनंदिन खर्च, आजार, शिक्षण आणि इतर गोष्टींवरील खर्चासाठी ही रक्कम तोकडी असल्याची ग्राहकांची तक्रार आहे.
मॅनेजिंग डायरेक्टर निलंबित
दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र को आप बँकेचे मॅनेजिंग डायरेकटर जॉय थॉमस यांना बँकेने निलंबित केलं आहे. रिझर्व्ह बँकेमार्फत नियुक्त प्रशासकांनी थॉमस यांना निलंबित केलं.
खातेदारांवर निर्बंध काय?
बँकेवर कोणकोणते निर्बंध?
संबंधित बातम्या
पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध, खातेदारांना महिन्याला 1 हजार रुपयेच काढता येणार
पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध, वयोवृद्ध दाम्पत्य औषधालाही महाग
या 9 बँका बंद होणार असल्याचा मेसेज खोटा, आरबीआयचं स्पष्टीकरण