अभिनेत्री मनवा नाईकसोबत कॅब चालकाचे गैरवर्तन, पोस्ट शेअर करून सांगितली आपबिती

प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक हिच्यासोबत उबेर कॅब चालकाने गर्वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनवाने याबद्दल फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री मनवा नाईकसोबत कॅब चालकाचे गैरवर्तन, पोस्ट शेअर करून सांगितली आपबिती
मनवा नाईक Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 4:01 PM

मुंबई, अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शिका मनवा नाईक (Manwa Naik) हिच्याशी मुंबईत एका उबर कॅब चालकाने गैरवर्तन (misbehave of uber Cab Driver) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर कॅब चालकाने तिला धमकीही दिल्याचे तिने सांगितले. अभिनेत्रीने मनवा नाईक हिने शनिवारी रात्री घरी जाण्यासाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथून उबेर कॅब घेतली. यादरम्यान कॅब चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले तसेच मार्गात सिग्नलवर वाहतूक पोलिसाशी वाद देखील घातला. खुद्द अभिनेत्रीने तिच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे.

मनवा सोबत नेमके काय घडले?

अभिनेत्रीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी रात्री 8.15 वाजता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधून उबेर टॅक्सी घेतली. बीकेसी (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे उबर चालकाने फोनवर बोलणे सुरू केले. ज्यावर मी आक्षेप घेतला. यानंतर बीकेसी सिग्नलही तोडला.  सिग्नल तोडल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी कॅब चालकाला थांबवून कॅबचा फोटो काढला. त्यावर कॅब चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

मी हस्तक्षेप केला. मी गाडीचा फोटो काढला आहे, त्यामुळे आता जाऊ द्या, असं मी पोलिसांना सांगितलं. पण त्या उबर चालकाला राग अनावर झाला होता.  तू 500 रुपये भरणार आहेस का? असं त्याने मला संतापून विचारलं.   तू फोनवर बोलत होतास असं मी त्याला म्हणाले. त्यानंतर त्याने पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि  मला धमकावणं सुरू केलं. थांब तुला दाखवतोच, अशा शब्दांत त्याने मला धमकावलं.

हे सुद्धा वाचा

मी त्याला गाडी पोलीस स्टेशनला घे, असं सांगितलं. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गडद अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.  मी पुन्हा गाडी पोलीस स्टेशनला घेण्यास सांगितले. संपूर्ण प्रवासात त्याने माझ्याशी वाद घातला. गाडी भरधाव वेगाने चालवत असतानाव वांद्रे कुर्ला संकुलाच्या परिसरात असलेल्या कुर्ला पुलावर त्याने पुन्हा एकदा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. काय करणार? थांब दाखवतोच आता, अशी धमकी त्याने मला दिली.

त्यानंतर मात्र मी उबर सेफ्टीला फोन केला. उबरमधील ग्राहक सेवा कर्मचाºयासोबत फोनवर बोलत असतानाही तो भरधाव  गाडी चालवत होता. हा सर्व प्रकार सुरु असताना गाडी चुनाभट्टी रोडवरील प्रियदर्शनी पार्कपर्यंत पोहोचली होती.   मी त्याला गाडी थांबव, असं सांगूनही त्याने माझं ऐकलं नाही. त्याने कोणाला तरी फोन केला. ते पाहून मी जोरजोरात ओरडू लागले. दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी त्या गाडीतून मला बाहेर काढलं. मी सध्या सुरक्षित आहे. पण नक्कीच या सर्व प्रसंगामुळे मी घाबरले आहे, असं मनवाने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी दिले कारवाईचे आश्वासन

मनवाच्या पोस्टवर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांना आश्वासन दिले आणि लिहिले, ‘मनवा जी, आम्ही या गंभीर घटनेची गंभीर दखल घेतली आहे! DCP झोन 8 यावर काम करत असून लवकरात लवकर दोषीला अटक करतील.” त्याबद्दल अभिनेत्रीने विश्वास नांगरे पाटील यांचे आभार मानले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.