‘उदयनराजे तर छत्रपती, ते आमच्या पक्षात आले तर स्वागतच’

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे तर छत्रपती आहेत.  तर जर पक्षात आले तर त्यापेक्षा चांगलं काय असं शकतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी टीव्ही9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नाराज खासदार भाजपच्या संपर्कात आहेत? राजकीय भूकंप घडवणार का? असा […]

'उदयनराजे तर छत्रपती, ते आमच्या पक्षात आले तर स्वागतच'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे तर छत्रपती आहेत.  तर जर पक्षात आले तर त्यापेक्षा चांगलं काय असं शकतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी टीव्ही9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नाराज खासदार भाजपच्या संपर्कात आहेत? राजकीय भूकंप घडवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला.

उद्धवजींना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा: मुख्यमंत्री

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. आमदार आहेत, खासदार आहेत, मी आज कोणाचीही नावं सांगू इच्छित नाही. पण मी एव्हढं निश्चित सांगतो, त्या दोन्ही पक्षातून अनेक नेते आमच्या पक्षात येऊ इच्छित आहेत”.

यानंतर मुख्यमंत्र्यांना उदयनराजे आले तर? असा सवाल करण्यात आला, त्यावर फडणवीस म्हणाले, “स्वागत आहे. उदयनराजेंचा निर्णय ते घेतात, त्यांचा निर्णय दुसरं कोणी घेऊ शकत नाही. छत्रपती आहेत. छत्रपती पक्षात यावेत, यापेक्षा चांगलं काय असू शकतं? आम्ही नक्की स्वागत करु”

उद्धव ठाकरेंना आशिर्वाद मिळावा

यावेळी मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या राम मंदिराच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले.

राम मंदिर हा राम भक्त्तांचा मुद्दा आहे. तमाम हिंदूंना वाटतं की ज्या ठिकाणी प्रभू रामांचा जन्म झाला, तिथे मंदिर असावं. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. शिवसेनाही त्यामध्ये येत असेल तर ताकद वाढेल. उद्धव ठाकरे आयोध्येला जात असतील तर प्रभू श्रीरामांचा आशिर्वाद उद्धवजींना मिळावा.राजकीय परिस्थितीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर त्यांना शुभेच्छाच देईन. ते माझे चांगले मित्र आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

संबंधित बातमी

शिवस्मारक बोट दुर्घटनेनंतरही मुख्यमंत्री ‘त्या’ घोषणेवर ठाम!   

उद्धवजींना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा: मुख्यमंत्री

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.