उदयनराजेंचे मनापासून आभार, राष्ट्रवादीच्या नेत्याकडून उदयनराजेंच्या भूमिकेबद्दल पाठराखण…

पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडल्यानंतर काही क्षणातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत त्यांनी खासदार उदयनराजे यांचे आभार मानले आहेत.

उदयनराजेंचे मनापासून आभार, राष्ट्रवादीच्या नेत्याकडून उदयनराजेंच्या भूमिकेबद्दल पाठराखण...
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 5:46 PM

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर जोरदार टीका करण्यात आली होती. राज्यपाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीनेही त्यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.

या वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर खासदार उदयनराजे आणि संभाजीरराजे यांनी महाराष्ट्र बंदची हाक देत त्यांची हाकलपट्टी करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले होते.

आजची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही क्षणातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे जाहीर आभार मानत त्यांची पाठराखण केली आहे.

भाजपचे खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

राजकीय वापरासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करता पण त्यांची अवहेलना झाली तर मात्र कोणीही भूमिका घेत नाही मग छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव तु्म्ही घेताच कशाला असा जोरदार हल्लाबोल भाजपसह इतर राजकीय पक्षांवरही केला.

उदयनराजे यांनी राजकीय पक्षांवर टीका करताना आपल्याल हे आता सहन होत नाही असे भावनिक उद्गगार काढत ते भावनिकही झाले होते.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत त्यांचे आभार मानले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, याआधीच उदयनराजे यांनी अशी भूमिका घेतली असती तर कुणाचीही हिम्मतही झाली नसती असं ट्विट करत त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

उदयनराजे भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आपल्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

त्यावेळीच उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट असते आणि आज पत्रकार परिषद घेऊन मी माझी बाजू मांडणार असल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकीय पक्षांसह महत्वाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तिंवर जोरदार निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडल्यानंतर काही क्षणातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत त्यांनी खासदार उदयनराजे यांचे आभार मानले आहेत.

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.