Uddhav Thackeray Appeal to ST Workers: तुम्ही आमचेच आहात, तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन प्रयत्नशील, उद्धव ठाकरेंचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन करत प्रवाशांना वेठीस धरणारं आंदोलन करु नका, असं आवाहन केलं आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन करत प्रवाशांना वेठीस धरणारं आंदोलन करु नका, असं आवाहन केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा
आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
राजकीय पक्षांनी चिथावणी देऊ नये
राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
इतर बातम्या:
Uddhav Thackeray appeal to ST Workers to stop agitation we are working for you and appeal political parties to dont politicise issue