Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : महाराष्ट्र द्रोह्यांनो… गेट आऊट ऑफ इंडिया; शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Get Out of India : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने आज आक्रमक आंदोलन केले. राज्यभरात जोरदार आंदोलन झाले. यावेळी मुंबईत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गेट ऑऊट ऑफ इंडिया असा इशारा दिला.

Uddhav Thackeray : महाराष्ट्र द्रोह्यांनो... गेट आऊट ऑफ इंडिया; शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
गेट ऑऊट ऑफ इंडिया
Follow us
| Updated on: Sep 01, 2024 | 12:58 PM

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने आज आक्रमक आंदोलन केले. राज्यभरात राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीने मोर्चा काढला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गेट ऑफ इंडिया असा इशारा दिला. हे सरकार सत्तेतून खाली खेचा अशी संतप्त प्रतिक्रिया महाविकास आघाडीने दिली.

गेट ऑऊट ऑफ इंडिया

गेट वे ऑफ इंडिया आपल्या देशाचं प्रवेशद्वार आहे. इथे शिवद्रोही सरकार आहे. घटनाबाह्य सरकार आहे. त्यांना सांगूया गेट आऊट ऑफ इंडिया. गेट आऊट. चालते व्हा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. म्हणूनच इथे बसलो आहोत. देशाचे पंतप्रधान आले. त्यांनी माफी मागितली. माफी मागितली नसती तर तुम्हीला महाराष्ट्राने ठेवलं नसतं. माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. ही मग्रुरी मान्य आहे का. माफी मागताना मग्रुरी कसली, असा सवाल करत हे माफीचे केवळ नाट्य असल्याचा दावा केला.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांसोबत दीड शहाणे

स्टेजवर मुख्यमंत्री बसले होते. सोबत दीड शहाणे, दोन शहाणे होते. एक फूल दोन हाफ होते. एक हाफ तर नाचत होता. मोदींनी माफी कशासाठी मागितली. पुतळा पडला म्हणून माफी मागितली की पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली. भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरून घालण्यासाठी मागितली, असा सवाल त्यांनी विचारला.

मोदी तुम्ही आला. निवडणुकीसाठी आला होताच. आम्हाला अभिमान वाटला होता. नौदल दिन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होतोय याचा आनंद वाटला. तेव्हा घाईत पुतळा बसवण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते मोदी गॅरंटी आहे. हीच ती मोदी गॅरंटी जिथे हात लावीन तिथे सत्यानाश होईल. माफी तुम्ही कुणाकुणाची मागणार. भ्रष्टाचाराने पुतळा कोसळला त्याची माफी मागणार, राममंदिर गळतंय त्याची माफी मागणार, की घाई गडबडीने बांधलेलं संसद गळतंय म्हणून माफी मागणार, असा चिमटा त्यांनी मोदी यांना काढला.

चुकीला माफी नाही

महाराष्ट्रात जे वातावरण चाललं आहे. त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला. शिवद्रोही मंडळी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरले. तुम्ही राजकारण करत आहेत असा आरोप आहे. मी म्हणेल ते करतात ते राजकारण नाही. गजकरण आहे.खाजवत बसत आहे. खाजवू द्या त्यांना. चुकीला माफी नाही, असा सज्जड दम त्यांनी सत्ताधाऱ्यांना भरला.

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.