मी आधी बोललो तर पियुष गोयल यांना राग आला, मात्र त्यांचे धन्यवाद : उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन 5 च्या निमित्ताने जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची जुनी आठवण काढत आभार मानले आहे (Uddhav Thackeray on Piyush Goel).

मी आधी बोललो तर पियुष गोयल यांना राग आला, मात्र त्यांचे धन्यवाद : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 31, 2020 | 11:04 PM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन 5 च्या निमित्ताने जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची जुनी आठवण काढत आभार मानले आहे (Uddhav Thackeray on Piyush Goel). याआधी रेल्वेच्या प्रश्नावरुन मी बोललो तेव्हा पियुष गोयल यांना राग आला होता. मात्र, त्यांनी स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे उपलब्ध करुन दिल्या त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. आपल्या व्हिडीओ संदेशात त्यांनी अनेक विषयावर राज्य सरकारचे काय विचार आहे याविषयी स्पष्ट भूमिकाही व्यक्त केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मागच्यावेळी मी त्यांना बोललो तर पियुष गोयल यांना राग आला होता. मात्र, मजुरांसाठी रेल्वे उपलब्ध करुन दिल्यानेच साडेअकरा लाख मजूर प्रवास करु शकले. यासाठी मी पियुष गोयल यांना धन्यवाद देतो. आपण 800 रेल्वे सोडल्या. याद्वारे जवळपास 16 लाख स्थलातरित मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आलं आहे.”

“परीक्षांचं काय करायचं यावर काम सुरु आहे. मी कुलगुरुंची बैठक घेतली. सर्वांचं म्हणणं आहे की तात्काळ परीक्षा घेणं शक्य नाही. ते कुलगुरु आणि मी मुख्यमंत्री असलो तरी आमच्यातील पालक जीवंत आहे. त्याप्रमाणे आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे आपण मागील परीक्षांच्या (सेमिस्टर) निकालाची सरासरी काढून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल. काहींना सरासरीपेक्षा आपण अधिक गुण मिळवू शकलो असतो असं वाटेल त्यांच्यासाठी आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन ऑक्टोबर/नोव्हेंबर जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांना परीक्षेचीही संधी दिली जाईल,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

ते म्हणाले, “पहिल वर्ष सुरु कसं करणार, पहिलीची सुरुवात कशी करणार हेही प्रश्न आहेत. शाळा सुरु करायच्या का हाही प्रश्न आहे. मात्र, सध्या या शाळा विलगीकरणासाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र, असं असलं तरी शाळा सुरु करण्यासाठी त्या शाळा मोकळ्या करता येतील. त्या निर्जंतुकीकरण करता येईल. मात्र, इतर देशांमध्ये शाळा सुरु करुन बंद करण्याची वेळ आली आहे. मात्र, शाळा सुरु करण्याऐवजी शिक्षण सुरु करण्यावर आपला भर आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी शाळा सुरु करता आल्या तर तेही पाहिलं जाईल. पण शहरात ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याबाबत पर्याय तपासले जातील.”

“कोरोनाने आपल्याला धडा दिला, आता आगामी काळात आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष देणार”

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिक्षण सुरु झालंच पाहिजे, मात्र कोरोनाने आपल्याला काही गोष्टी शिकवल्या आहेत. त्याने आपल्याला शिक्षणाकडे, आरोग्याकडे पाहायला शिकवले. याआधी कदाचित शिक्षण आणि आरोग्याकडे तितकं लक्ष दिलं गेलं नसेल, मात्र, आता आपल्याला कोणत्याही परिस्थिती या गोष्टी सुरु राहतील याकडे लक्ष द्यावं लागेल. येत्या काळात आरोग्य, शिक्षण, ग्रामीण भागात, छोट्या शहरात रुग्णालयांची व्यवस्था सज्ज ठेवायची असा निर्णय घेण्यात येणार आहे. इतरवेळी या इमारती इतर गोष्टींसाठी वापरता येतील. मात्र, गरजेच्यावेळी या सुविधा आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरता येईल यावर भर दिला जाईल.”

आता जबाबदारी आणि खबरदारी दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. सरकारने जबाबदारी घेतली आहे, आता तुम्ही खबरदारी घ्यायची आहे. सरकार पडणार नाहीच, पण तु्म्ही सोबत असेल तर ते अजिबातच होणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

Uddhav Thackeray on Piyush Goel

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.