Uddhav Thackeray : अपात्र सरकारला निरोप देऊ, उद्धव ठाकरेंनी तारीखही सांगून टाकली!

Uddhav Thackeraya : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधत सरकार सरत्य वर्षाची तारीख सांगत सरकारला निरोप देऊ असं म्हटलं आहे.

Uddhav Thackeray : अपात्र सरकारला निरोप देऊ, उद्धव ठाकरेंनी तारीखही सांगून टाकली!
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 1:58 PM

मुंबई : ठाकारे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. यावेळी बोलताना ठाकरेंनी अपात्र आमदार प्रकरण आणि मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ठाकरेंनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव न घेता निशाणा साधला. त्यासोबतच या सरकारला डिसेंबर महिन्यात आपण निरोप देऊ म्हणत ठाकरेंनी तारीखही सांगितली आहे.

दसऱ्याच्या माझ्या भाषणात बोललो होतो, सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व काय असणार आहे. त्यावर आधारीत देशातील घटना ती आणि देशाची लोकशाही टिकणार की नाही याकडे जगाचं लक्ष आहे. आपला देश जागतिक लोकसंख्येत नंबर एक आहे. त्यामुळे सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली असेल तर सर्वोच्च न्यायालय काय करते हे पाहावं लागणार आहे. लवाद सर्वोच्च न्यायालयाचे निकाल मानणार की नाही. लवाद सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आपल्या मर्जीने आणि मस्तीने मानणार नसतील तर या देशाची हाल जे काही होतील ते सावरता येणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

या तारखेला निरोप

घटनेने न्याय निवडा होईल याची खात्री आहे, राज्याला न्यायदानाची परंपरा आहे. रामशास्त्री बाणा आपण म्हणतो. सत्ताधीश कितीही बलवान असला तरी त्याच्यासमोर न झुकता न्याय देण्याची परंपरा महाराष्ट्राने दिली आहे. त्याच परंपरेला जागून केवळ शिवसेनेलाच नाही तर लोकशाहीला न्याय मिळेल अशी खात्री आहे. अशी खात्री आहे असं वाटल्यामुळे 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला आपण निरोप देऊ असा विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला.

दरम्यान,  सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना आदेश दिला आहे, आपल्याकडे तो आदेश आला आहे. नार्वेकर म्हणाले, मी आदेश वाचला नाही. त्यामुळे मी हा आदेश वाचून दाखवत आहे. मी माझ्या आमदारांना सांगणार आहे की, जर नार्वेकर मुंबईत असतील तर त्याची कॉपी त्यांना द्या आणि त्यांच्या समोरही वाचन करा, उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.