“बोम्मईंच्या ट्विटचा खुलासा म्हणजे जखमेवर मीठ चोळणे”; उद्धव ठाकरे यांचा सीमावादावरून सरकारवर हल्लाबोल
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यानंतर त्यांच्या ट्विटवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी खुलासा केला.
मुंबईः मुंबईः सीमावाद चिघळल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर आम्ही ठोस भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस या दोघांवरही जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही दिल्लीतील बैठकीतून होयला होय करुन आले असल्याची टीका केली आहे. त्यामुळे सीमावादावरून राज्यातील राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यानंतर त्यांच्या ट्विटवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी खुलासा केला.
त्यांनी खुलासा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या ट्विटचा खुलासा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यातील प्रकार असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या बैठकीत आम्ही ठाम भूमिका मांडली असंही त्यांनी सांगितले होते. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी 15 मिनिटं दिली हेच आमच्यासाठी खूप झाली असा टोलाही त्यांना लगावला आहे.
ज्या ज्यावेळी सीमावादावर चर्चा करण्यात आली आहे. त्यावेळी कर्नाटकच्याच बाजून सीमावाद चिघळवण्यात आला आहे. त्यामुळे कालच्या बैठकीला तसा काही अर्थच नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या भेटीबद्दल बोलताना सांगितले की, सीमावाद हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही गृहमंत्री अमित शहांनी या विषयावर चर्चा केली आहे.
यावरही उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, हा प्रश्न न्यायप्रविष्ठ होता तर मग बेळगावला उपराजधानीचा दर्जा का देण्यात आला. त्याच ठिकाणी हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय कर्नाटकने का घेतले असा सवाल त्यांनी केला आहे.