ठाकरे गटाचे 15 आमदार निलंबित होणार? व्हीपचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार; संजय शिरसाट यांचा थेट इशारा

संजय राऊतांनी जे दोन हजार कोटींचे आरोप लावले आहेत. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सायको माणसाला उत्तर देण्याची गरज नाही. आम्हाला आयोगाची मान्यता आहे.

ठाकरे गटाचे 15 आमदार निलंबित होणार? व्हीपचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार; संजय शिरसाट यांचा थेट इशारा
sanjay shirsat Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 1:19 PM

मुंबई : ठाकरे गटासाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हीपचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल, असा इशाराच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आमचे प्रतोद जो निर्णय घेतील तो ठाकरे गटाच्या आमदारांना बंधनकारक राहणारच आहे, असं शिरसाट यांनी सांगितलं. शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते. शिरसाट यांच्या या इशाऱ्यामुळे ठाकरे गटाचे आमदार व्हीप पाळणार का? व्हीप नाही पाळल्यास ठाकरे गटाचे 15 आमदार अपात्र ठरणार का? असे सवालही या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

आम्ही 56 आमदारांना व्हीप बजावला आहे. जे व्हीप मानणार नाही त्यांच्यावर कारवाई होईल. व्हीप पाळणं सर्वांना बंधनकारक आहे. व्हीप पाळला नाही तर अपात्रतेची कारवाई होईल, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. व्हीप न पाळणाऱ्यांवर काय कारवाई करायची हे शिवसेनेचे प्रतोद ठरवतील, असंही शिरसाट यांनी सांगितलं. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. तसेच निवडणूक आयोग आणि शिंदे गटात न्याय विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींची डील झाली होती, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरही शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

आठ दिवस थांबा

संजय राऊत पागल आदमी है. त्यांच्या बाबत वारंवार विचारू नका. आठ दिवस थांबा संजय राऊत यांना उत्तर देऊ. कुत्रं पिसाळल्यावर त्याला काय चावायचं असतं का? त्याला कोणतं तरी औषध दिलं जातं. थोडं थांबा. राऊतांवर बोलून आम्ही चिखल उडवून घेणार नाही, असं ते म्हणाले.

राऊत सायको

संजय राऊतांनी जे दोन हजार कोटींचे आरोप लावले आहेत. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सायको माणसाला उत्तर देण्याची गरज नाही. आम्हाला आयोगाची मान्यता आहे. त्यांचं डिस्क्वॉलिफिकेशन कसं होईल हे आम्ही पाहणार आहोत. ती कारवाई झाली पाहिजे. त्यांची मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले आहे. त्यांच्यासारखी भाषा आम्हाला वापरता येते. पण ती आम्ही वापरणार नाही, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.