Uddhav Thackeray : पुढच्या विधानसभेतही शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने दिसले पाहिजेत; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र
शिवसेनेचा पहिला महापौर निवडून येणं 1971मध्ये हेच मोठं होतं. त्यावेळी नगरसेवक निवडून येणं हेच मोठं होतं. आज आमदार आपले आहेत. मुख्यमंत्री आपले आहेत. त्यामुळे पुढच्या विधानसभेतही शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने दिसले पाहिजेत, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
मुंबई : 56 वर्षाच्या शिवसेनेच्या वाटचालीत अनेक शिवसैनिक आपल्याला सोडून गेले. त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांनी त्याग केला नसता तर आज आपण हे पाहू शकलो नसतो, असे मत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आज शिवसेना पक्षाने (Shivsena) 56 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त त्यांनी सर्व शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. ते म्हणाले. दिवाकर रावते आणि सुभाष देसाई हे शिवसेनाप्रमुखांसोबतचे साथी आहेत. शिवसेनेचा पहिला महापौर (Mayor) निवडून येणं 1971मध्ये हेच मोठं होतं. त्यावेळी नगरसेवक निवडून येणं हेच मोठं होतं. आज आमदार आपले आहेत. मुख्यमंत्री आपले आहेत. त्यामुळे पुढच्या विधानसभेतही शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने दिसले पाहिजेत, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
‘…तरीही धुसफूस नाही’
ते म्हणाले, की जबाबदारी माझी आहे. पक्षप्रमुख म्हटल्यावर जबाबदारी माझ्यावर आहे. मी विधान परिषदेची उमेदवारी नाही दिली. पण त्यांनी धुसफूस केली नाही. ते आपल्यासोबत आले. दुसऱ्यासाठी झटणारा शिवसैनिक यांच्यात आहेत. दिवाकर रावते आणि देसाई यांची ओळख करून देण्याची गरज नाही. या दोन्ही नेत्यांना जी जी जबाबदारी दिली ती त्यांनी पूर्ण केली. आणीबाणीच्या काळात मार्मिक छापून द्याययाला तयार कोणी नव्हतं. तेव्हा मार्मिक छापून हातगाडीवरून वाटण्याचं काम रावतेंनी केलं आहे. 85नंतर मार्मिक लवकरच दैनिकाच्या स्वरुपात भेटायला येणार असं शिवसेनाप्रमुख दरवेळी सांगायचे. पण ते पूर्ण होत नव्हतं. मी साहेबांना म्हटलं दैनिकांची जबाबदारी घेऊ का. तेव्हा त्यांना म्हटलं तुमच्या टीमचा एक माणूस हवा. ते म्हणाले कोण, मी म्हटलं सुभाष देसाई. तेव्हापासून ते माझ्यासोबत जोडले गेले ते आजपर्यंत…
‘पायलट गेला तर मोठं नुकसान होतं’
पुढे ते म्हणाले, की सुभाष देसाई रावते वयाने मोठे आहेत. पण ते मला नेता मानून काम करत आहेत. तुम्ही निवृत्त झालात असं समजू नका. तुम्ही मला शिवसेनेच्या कामासाठी हवे आहेत. या निवडणुकीत तुम्हाला काही मार्गदर्शन करण्मयाची गरज नाही. हॉटेलात ठेवले आहे. बडदास्त ठेवावी लागते. यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार नगरसेवक खासदार यांना एकत्रं ठेवणं ही आजची लोकशाही आहे. उद्याच्या निवडणुकीनंतर याच्याहून चांगलं चित्रं दिसलं पाहिजे. आज आमदारच नाही. सर्व कार्यकर्ते आहेत. आपल्या स्वतचे आमदार संख्यने एवढे दिसले पाहिजे. रमेश लटके गेले. एक कट्टर कार्यकर्ता गेला. नुकसान होतं. चांगला पायलट त्याचं ट्रेनिंग. विमान पडलं तर नुकसान भरून निघतं. पण पायलट गेला तर मोठं नुकसान होतं. कार्यकर्ता गेला तर मोठं नुकसान होतं, असे ते म्हणाले.