खासदार संजय राऊत यांच्या त्या विधानावरून डॉक्टरांची नाराजी, उद्धव ठाकरे यांना हे करावं लागलं

खासगी डॉक्टरांनी डॉक्टर आर्मी स्थापन करून केलेल्या कामाची आठवण करून दिली. मग अचानक सगळी चक्रे फिरली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला.

खासदार संजय राऊत यांच्या त्या विधानावरून डॉक्टरांची नाराजी, उद्धव ठाकरे यांना हे करावं लागलं
संजय राऊत Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 3:56 PM

मुंबई : विरोधी पक्षावर टीका करण्याच्या नादात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोवीडमधील राज्यातील डॉक्टर आणि नर्सबाबत वादग्रस्त विधान केलं. त्या विधानावरून आता कोविडमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना भेट घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच डॉक्टरांची समजूत काढावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कोविडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले असे विधान केले.

राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांपर्यंत या वक्तव्याची माहिती पोहचली. त्याविरोधात सगळीकडूनच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषतः कल्याण आणि डोंबिवलीतील डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी तर खासदार राऊत यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीच. पण त्याचसोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध

कल्याणमधील इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्यापर्यंत या वक्तव्याची माहिती गेली. त्यांनीही यावर आपला रोष व्यक्त केला. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याणातील नेते विजय साळवी यांच्याशी संपर्क साधला. खासदार राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर परखडपणे आपला निषेध नोंदवला.

ठाकरे यांनी पाटील यांच्याशी साधला संपर्क

तसेच कोवीडच्या सुरुवातीपासून कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांनी डॉक्टर आर्मी स्थापन करून केलेल्या कामाची आठवण करून दिली. मग अचानक सगळी चक्रे फिरली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला.

उद्धव ठाकरे यांचा वादावर पडदा

खासगी डॉक्टर आणि त्यांच्या संघटनानी कोविड काळात केलेल्या कामाबाबत सहमती दर्शवली. तसेच आपला राज्यातील सर्व डॉक्टर आणि त्यांच्या संघटनांवर विश्वास आणि त्यांच्याप्रती मनामध्ये आदर असल्याचे सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वादावर पडदा टाकला आहे. अशी माहिती कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.