उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते अंबादान दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद जाणार, कारण…

Shiv Sena Uddhav Thackeray | विधान परिषदेतील ठाकरे गटाच संख्याबळ कमी होत आहे. सध्या ठाकरे गटाकडे 7 आमदार आहे. तसेच त्यामधील 3 आमदारांचा कार्यकाळ जुन आणि जुलैमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे विरोधी पक्ष नेते पद धोक्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते अंबादान दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद जाणार, कारण...
ambadas danve and uddhav thackeray
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 2:55 PM

मुंबई | 17 मार्च 2024 : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यापुढे निर्माण झालेल्या एकेएक अडचणी कमी होत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवता आले असते, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांच्या पक्षातील नेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले. परंतु आता दानवे यांचे हे पद धोक्यात आहे. कारण शिवसेना उबाठाचे विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. आमश्या पाडवी आता शिंदे गटात जात आहे. त्यामुळे विधान परिषदेतील उद्धव ठाकरे गटाची संख्या एकाने कमी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ जास्त झाले आहे.

काय आहे विधान परिषदेतील परिस्थिती

विधान परिषदेतील ठाकरे गटाच संख्याबळ कमी होत आहे. सध्या ठाकरे गटाकडे 7 आमदार आहे. तसेच त्यामधील 3 आमदारांचा कार्यकाळ जुन आणि जुलैमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे विरोधी पक्ष नेते पद धोक्यात आले आहे. सध्या काँग्रेसचे 8 आमदार आहेत. त्यापैकी 2 आमदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपत आहे.

सध्या अशी आहे विरोध पक्षातील आमदारांची संख्या

  • ठाकरे – 7
  • काँग्रेस – 8
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 3

जुलै महिन्यानंतर असे असणार संख्याबळ

  • ठाकरे गट – 4
  • काँग्रेस – 6
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 3

काँग्रेस परिषद आमदार

  1. जयंत आसगावकर – 6 डिसेंबर 2026
  2. भाई जगताप – 7 जुलै 2028
  3. सतेज पाटील – 1 जानेवारी 2028
  4. वजाहत मिर्झा – 27 जुलै 2024
  5. राजेश राठोड – 13 मे 2026
  6. धीरज लिंगाडे – 7 फेब्रुवारी 2029
  7. अभिजीत वंजारी – 6 डिसेंबर 2026
  8. प्रज्ञा सातव – 27 जुलै 2024

ठाकरे गटाचे सध्याचे 7 आमदार आणि त्यांचा संपण्याचा कार्यकाळ

  1. सचिन अहिर – 7 जुलै 2028
  2. उद्धव ठाकरे – 13 मे 2026
  3. नरेंद्र दराडे – 21 जुन 2024
  4. अंबादास दानवे – 21 ऑगस्ट 2025
  5. अनिल परब – 27 जुलै 2024
  6. विलास पोतनिस – 7 जुलै 2024
  7. सुनील शिंदे – 1 जुलै 2028

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विधान परिषद

  1. शशिकांत शिंदे – 13 मे 2026
  2. एकनाथ खडसे – 7 जुलै 2028
  3. अरुण लाड – 6 डिसेंबर 2026

हे ही वाचा

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांना बाजूला करत बनवले आमदार, आता शिंदे गटात जाणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.