राहुल गांधींच्या ‘हिंदुत्वा’बाबतच्या विधानाला उद्धव ठाकरेंचं समर्थन की विरोध?; म्हणाले, त्यांचं विधान…

Uddhav Thackeray on Rahul Gandhi Statement : राहुल गांधींच्या 'हिंदुत्वा'बाबतचं विधान चर्चेत आहे. राहुल गांधी यांच्या या विधानाला उद्धव ठाकरेंचं समर्थन आहे की विरोध आहे? विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे काय म्हणाले? वाचा सविस्तर.......

राहुल गांधींच्या 'हिंदुत्वा'बाबतच्या विधानाला उद्धव ठाकरेंचं समर्थन की विरोध?; म्हणाले, त्यांचं विधान...
राहुल गांधी, उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 3:36 PM

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल संसदेत भाषण केलं. त्यांच्या या भाषणाची देशभरात चर्चा होत आहे. राहुल गांधी यांनी काल बोलताना भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आरएसएस म्हणजे हिंदुत्व नाही, असं ठणकावून सांगितलं. राहुल गांधींच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेतला. राहुल गांधी यांनी हिंदुंचा आणि हिंदुत्वाचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना राहुल गांधींवर प्रति शाब्दिक हल्ला केला. यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आमच्या पैकी कुणी हिंदुत्वाचा अपमान करणार नाही आणि कुणी सहन देखील करणार नाही. राहुल गांधी म्हणाले ते योग्यच आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही… हे मी याआधीही म्हणालो आहे. मी भाजपला सोडलेलं आहे. हिंदुत्व सोडलेलं नाही. इथून पुढेही हिंदुत्व सोडणं शक्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, असं राहुल गांधींनी ठासून सांगितलं आहे. पण भाजपच्या लोकांनी राहुल गांधींवर हिंदुत्वाचा अपमान केल्याचा ठपका ठेवला आहे. पण त्यांनी हिंदुत्वाचा अपमान केलेलाच नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

राहुल गांधी काल बोलताना जय संविधान म्हणाले. त्यांच्या ‘जय संविधान’ म्हणण्याने काहींना मिर्च्या झोंबल्यात. ज्यांना ‘जय संविधान’ मिर्च्या झोंबल्यात त्यांच्या निषेधाचा ठराव दोन्ही सभागृहात मांडावा आणि तो लोकसभेत पाठवावा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

‘जय संविधान’ म्हणत राहुल गांधी यांनी कालच्या लोकसभेतील भाषणाला सुरूवात केली. गेल्या 10 वर्षात पद्धतीशीरपणे संविधानावर, ‘आयडिया ऑफ इंडिया’वर भाजपकडून हल्ला केला जात आहे. काही आमच्या नेत्यांवर हल्ल्ला केला जात आहे. लोकांना कारागृहात टाकलं जात आहे. लोकांना धमकावले जात आहे. खासदारांना निलंबित केलं जात आहे. पण आम्ही देशांच्या संविधानाचं रक्षण केलं आहे. देशातील जनतेने देशाच्या संविधानाचं रक्षण केलं आहे, असं राहुल गांधी यांनी काल लोकसभेत म्हटलं.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.