Uddhav Thackeray : आता शाखा-शाखांमध्ये चिन्हावरुन ‘सामना’; उद्धव ठाकरे यांच्या त्या आदेशामुळे दोन्ही गट आमने-सामने

Uddhav Thackeray Mashal : पुणे येथील पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटायला लागले आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर मुंबईसह राज्यात पुन्हा राडा होण्याची चिन्हं आहेत.

Uddhav Thackeray : आता शाखा-शाखांमध्ये चिन्हावरुन 'सामना'; उद्धव ठाकरे यांच्या त्या आदेशामुळे दोन्ही गट आमने-सामने
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, मशाल, धनुष्यबाण
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 9:11 AM

उद्धव ठाकरे यांनी नुकताच पुण्यात पक्षाच्या मेळाव्यात शिवसैनिकांना एक आदेश दिला. त्यांनी या सभेत अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी अत्यंत जहाल भाषेचा वापर केल्यानंतर भाजपने पण तिखट प्रतिक्रिया दिली. शिंदे सेना बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह गेले. तर उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाले. आता चिन्हावरुन पुन्हा महाभारत होण्याची चिन्हं आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. विधानसभेच्या तोंडावर मुंबईसह राज्यात पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांचा आदेश काय?

पुण्यात 3 ऑगस्ट रोजी पक्षाचा मेळावा झाला. त्यात उद्धव ठाकरे यांनी सभेच्या अखेरीस शिवसैनिकांना एक आदेश दिला. शाखा-शाखांतील बोर्डावर जी धनुष्य-बाणाची निशाणी आहे, ती हटवा आणि त्याठिकाणी मशाल चिन्ह लावा, असा आदेश त्यांनी पदाधिकारी, शिवसैनिकांना दिला. त्यांच्या या आदेशामुळे ज्या ठिकाणी शाखेवरुन वाद सुरु आहे अथवा ज्या ठिकाणी दोन्ही गट मजबूत आहे, तिथे वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यापूर्वी पण शाखांवरुन दोन्ही गटातील पदाधिकारी भिडल्याचे राज्याने पाहिले आहे. खास करुन ठाणे, मुंबईत हा प्रकार घडला होता.

हे सुद्धा वाचा

दोन्ही गट आले आमने-सामने

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशामुळे शिंदे गट ठाकरे गट आमने-सामने आले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाकरे गटातील पदाधिकारी आपापल्या भागातील धनुष्यबाण काढायच्या कामाला लागले आहेत. परंतु यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट अनेक भागात आमने-सामने आले. प्रभादेवी भागात अशीच परिस्थिती झाली आहे.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला एका लोखंडी बोर्डाच्या तिथे धनुष्यबाणाचे चिन्ह काढत असताना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने मारल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतून हे लोखंडी पोस्टर लावले असल्याचं शिंदे गटाचे म्हणणं आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून खोडसाळपणा केल्या असल्याचं शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला. मुंबई आणि पुणे येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भागात जिथे जिथे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आहे ते काढा आणि मशाल लावा असे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.