“हे प्रकरण आता देशभर पेटेल”; उद्धव ठाकरे यांनी देशासमोरील राजकीय संकट सांगितलं

उद्धव ठाकरे यांनी या निकालाविषयी बोलताना सांगितले की, या प्रकारचे निर्णय निवडणूक आयोग देत असेल तर त्यांच्यावर खटला भरला जाईल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

हे प्रकरण आता देशभर पेटेल; उद्धव ठाकरे यांनी देशासमोरील राजकीय संकट सांगितलं
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 3:26 PM

मुंबईः शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहचला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिंदे गटावर तोफ डागली आहे. शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनीही शिंदे गटावर सडकून टीका केली होती.

त्यातच आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता आपल्या वडिलांचे नाव वापरून त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मात्र ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान देण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना सांगितले की, निवडणूक आयोग जर आमदार खासदारांच्या संख्येवर निर्णय देत असतील तर योग्य नाही.

त्यामुळे हा निवडणूक आयोगा बरखास्त केला पाहिजे. निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे निवडणूक आयोग नेमला पाहिजे. हा निकाल मला मान्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हा राजकीय अन्याय झाला आहे असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे. पक्षाचे हे चिन्हं दिलं असलं तरी शिवसेना संपेल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी या निकालाविषयी बोलताना सांगितले की, या प्रकारचे निर्णय निवडणूक आयोग देत असेल तर त्यांच्यावर खटला भरला जाईल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही, त्यामुळे निवडणू आयोगाच्या या या निर्णयाविरोधात हे प्रकरण आता देशभर पेटेल.

आज देशातील एका पक्षावर वेळ आली आहे, तर उद्या ही वेळ दुसऱ्या पक्षावरही येईल आणि पक्षही संपवतील की काय ही भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.