महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार?; उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच सांगितला आकडा
महाविकास आघाडीला या लोकसभा निवडणुकीमध्ये किती जागा मिळणार याचा आकडा उद्धव ठाकरे यांनी सांगितला आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय ठरलं होतं याबाबतही भाष्य केलं.
लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया बाकी असताना काही नेत्यांनी किती जागा येणार याबाबत दावे केले आहेत. अशातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पहिल्यांदाचा महाविकास आघाडीच्या किती जागा येणार हा आकडा पहिल्यांदाच सांगितला आहे. टीव्ही9 मराठीला दिलेल्या महामुलाखतीमध्ये त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला त्यासोबतच परत एकदा बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा होती यावर भाष्य केलं.
मी सांगतो 48 च्या 48 जागा येणार आहे. ३५ जागा येणार तर कोणत्या १३ जागा पडणार? मग आपण अंदाज काढतो. मी अंदाज पंचे कधी सांगत नाही. मी जिंकण्याची तयारी करतो. म्हणून म्हणतो 48 च्या 48 जागांवर जिंकेल असं मला वाटतं. माझ्या सभांना गर्दी होते. हे माझं कर्तृत्व नाही. माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांना आपण जे उभं केलं त्याचं काय होईल असं वाटत असेल म्हणून मी त्यांना वचन दिलं. माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारलं. शिवसेना जशीच्या तशी पुढे नेईन सांगितलं. हे मी अमित शाह यांना हे सर्व सांगितलं. तेव्हा ते म्हणाले ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. मी म्हणालो असं करू नका. कृपा करून. कारण आपल्यातच पाडापाडी होईल. आपण क्लिअरकट अंडरस्टँडिंग करू. अडीच वर्ष तुमची असतील मला काही हरकत नाही. अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेला दिली तर आपण पत्र तयार करू, त्या पत्रावर पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल. शिवसेना जो मुख्यमंत्री असेल त्याची सही असेल. आणि वर मसुद्यात शिवसेना मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल असं लिहू. ते पत्र तुम्ही होर्डिंग करून मंत्रालयाच्या दारावर लावा, असं ठाकरेंनी सांगितलं.
जर अडीच वर्ष पहिली आम्हाला दिली तर आता हे ठरलं होतं. ते म्हणाले, ठिक आहे. आपण एक दुसऱ्याला सांभाळू. त्यानंतर आम्ही पीसीला गेलो. तेव्हा लोकसभेला एक दोन ते तीन महिने बाकी होते. विधानसभा चार पाच महिन्याने येणार होती. आताच मुख्यमंत्रीपद जाहीर करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांना पत्रकार परिषदेत सांगितलं की पदं आणि जबाबदाऱ्या समसमान वाटप होईल. आता मुख्यमंत्री हे या पदात येतं. मुख्यमंत्री हे जबाबदारीचं पद येतं. आता ज्याला समसमान याचा अर्थ कळतो त्याला तो कळल्याचं ठाकरे म्हणाले.