प्रविणजी, राजकारणाच्या पलीकडं म्हणजे नेमकं कुठं जायचं? अनेकांना दिल्लीत उभं राहावं लागतं बसायला मिळतं नाही, मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी
केवळ दिल्लीला जाऊन बसण्यापेक्षा महाराष्ट्र उभा करेन. हा क्रांतिकारक विचार गुलाबराव पाटील यांनी केला. नाहीतर अनेक जणांना केवळ दिल्लीला उभचं राहावं लागतं. बसायलाचं मिळत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यांनी लगावला आहे.
मुंबई: सहकारतपस्वी स्व. गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र म्हणजे हिम्मत आली, लढवय्येपणं आलं, जिद्द आली. संपूर्ण देशाला दिशा दाखवणारं म्हणजे महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र आहे. मला सहकार क्षेत्रातलं खूप काही कळत नाही पण या देशाला सहकाराचा मार्ग हा महाराष्ट्राने दाखवला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना टोले लगावले आहेत. सहकार क्षेत्र हे काही लेच्यापेच्या सारखं क्षेत्र काम नाही की हे बंद केलं, ते बंद केलं. सहकार क्षेत्राच्या समृद्धीसाठी काम करणं सरकारचं काम आहे. सहकाराची सुधारणा आणि त्याचं वैभव वाढवणं हे काम सरकारचं आहे. तांदळातून जसं खडे वेचून काढावे लागतात तसे काही खडे वेचून काढून सहकाराचा भात आहे, त्याचा सुवास आणि समृद्धी वाढवण्यासाठी महाविकासआघाडी सरकार काम केल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राजकारणाच्या पलीकडं म्हणजे कुठं जायचं?
केवळ दिल्लीला जाऊन बसण्यापेक्षा महाराष्ट्र उभा करेन. हा क्रांतिकारक विचार गुलाबराव पाटील यांनी केला. नाहीतर अनेक जणांना केवळ दिल्लीला उभचं राहावं लागतं. बसायलाचं मिळत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यांनी लगावला आहे. बसायची संधी नाकारून मी राज्याला उभं करेन, राज्याची अस्मिती हा मोठा विचार आहे, त्यातून जे काही उभं राहिलं हा मोठा विचार आहे. राजकारणाच्या पलीकडे जायचं, असं प्रविणजी तुम्ही म्हणाला म्हणजे नेमकं कुठं जायचं, कोणी जायचं, कसं जायचं आम्हांला सांगा. पण जर का तयारी असेल तर आमची तयारी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी प्रविण दरेकरांना टोला लगावला आहे.
सहकार क्षेत्र मोडून टाकावं अशी कुणाची धारणा असू नये. काही कारखाने चांगले चालतात. काही कारखाने अडचणीत आहे. गुलाबराव पाटील यांचं काम प्रेरणादायी आहे. मनगट सगळ्यांना असतात, मात्र, त्या मनगटात ताकद हे गुलाबराव पाटील यांनी दाखवून दिलं. सहाकारच्या सुधारणेसाठी आपल्याला सहकारात बदल करावे लागतील. त्यासाठी मनगटातील ताकद दाखवून द्यावी लागेल अन्यथा गुलाबराव पाटील यांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सहकाराच्या विकासासाठी मविआ कटिबद्ध
सहकार क्षेत्र नाहीतर सगळ्या क्षेत्रांना अडचणींचा मला सहकार क्षेत्रातल खूप काही कळत नाही पण या देशाला सहकाराचा मार्ग हा महाराष्ट्राने दाखवला आहे. सहकाराच्या सुधारणेसाठी खतपाणी घालण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. आपण सर्वांनी प्रामाणिकपणानं काम करुयात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सहकाराच्या समृद्धीसाठी जे जे काही करणं आवश्यक आहे, ते करण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
सहकाररतपस्वी स्व. गुलाबरावजी पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील ,सतेज पाटील,प्रवीण दरेकर ,विश्वजित कदम, शंभूराजं देसाई उपस्थित होते.
इतर बातम्या
संभाजी ब्रिगेड-भाजप युतीवर भाष्य, पुरुषोत्तम खेडेकर यांचा लेख जसाच्या तसा!
Uddhav Thackeray said we done everything for development of Cooperative sector