उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार होते, थेट पंतप्रधानांशी चर्चा झाली होती; शिंदे गटाच्या नेत्याचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट

मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं कबूल करून उद्धव ठाकरे दिल्लीहून आले होते. त्यांना वेळ हवा होता. सर्वांची समजूत घालण्यासाठी त्यांना वेळ हवा होता.

उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार होते, थेट पंतप्रधानांशी चर्चा झाली होती; शिंदे गटाच्या नेत्याचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 7:50 AM

मुंबई: शिंदे गटाचे नेते, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. या संदर्भात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठकही झाली होती. पण त्यांनी ऐनवेळेला निर्णय फिरवला, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला अर्धवट सत्य का सांगता? संपूर्ण सत्य का सांगत नाही? असा सवालही केसरक यांनी केला. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मीच भेट घडवून आणली होती, असा दावाही दीपक केसरकर यांनी केला. युतीपासून लांब जाणं उद्धव ठाकरे यांना स्वत:ला आवडलेलं नव्हतं. पुन्हा युती करण्याची त्यांनी वचनं दिली होती. तरीही युती केली. मग तुम्ही कुणावर आरोप करत आहात? मला हे माहीत आहे. कारण मी स्वत: हे घडवून आणलं होतं. त्यावेळी पंतप्रधान भेटही देत नव्हते. तेव्हा तुमची पंतप्रधानांशी भेट घडवून आणली.

हे सुद्धा वाचा

तुमची तिथे बोलणीही झाली. घडलेलं चुकीचं आहे. हे सुधारलं गेलं पाहिजे, अशी कबुली तुम्ही दिली होती. हे तुम्ही लोकांना का सांगत नाही? तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. पुन्हा भाजपसोबत युती करणार होते, असं दीपक केसरकर म्हणाले.

ही परिस्थिती का आली?

मूळात तुमच्यावर ही परिस्थिती का आली? हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. ते तुम्ही कधीच सांगितलं नाही. त्यामुळे मला वाटतं नेमकी ही परिस्थिती का उद्भवली हे सांगणं गरजेचं आहे. मी स्वत: साक्षीदार आहे. मी स्वत: हजर होतो. तुमची बोलणी चालली होती. तुम्ही भाजपशी युती करणार होता. तुम्ही वेळेत युती केली नाही. मग तुम्ही इतरांना दोष का देता?, असा सवाल त्यांनी केला.

तो मुद्दाही निकाली निघणार होता

मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं कबूल करून उद्धव ठाकरे दिल्लीहून आले होते. मुंबईत गेल्याबरोबर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, असं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं होतं. पंतप्रधानांनी तात्काळ राजीनामा मागितला नव्हता. तुम्हाला वाटेल तेव्हा राजीनामा द्या असं मोदी म्हणाले होते.

राजीनामा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनाही वेळ हवा होता. सर्वांची समजूत घालण्यासाठी त्यांना वेळ हवा होता. त्यांना पुरेसा वेळ दिला होता. अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद सोडायचे असेल तर ते ऑप्शनही त्यांच्याकडे होती.

अडीच अडीच वर्षाचाच मुद्दा होता ना… तोही निकाली निघत होता. पण त्यांनी राष्ट्रवादी मला पाच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला तयार आहे. तुम्हीही पाच वर्ष द्या असं म्हटलं. ते चुकीचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शिंदे, देसाईंना सांगितलं

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. या गोष्टी घडत असताना मी एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकलं. अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांना सांगितलं. तोपर्यंत या नेत्यांनाही या गोष्टी माहिती नव्हत्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोदी पॉझिटिव्ह होते

युती करण्यासाठी डायरेक्ट चर्चा करण्याचंही ठरलं होतं. पण पंतप्रधानांनी त्याला नकार दिला. ज्या माध्यमातून आपली चर्चा सुरू आहे, त्याच माध्यमातून आपली चर्चा सुरू राहील, असं पंतप्रधान म्हणाले होते.

पंतप्रधान अतिशय पॉझिटिव्ह होते. ठाकरे कुटुंबीयांबद्दल त्यांची वागणूक प्रेमळ होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर जे काही घडलं ते कितपत राजकारणात आणायचं हे त्यांनी ठरवायला हवं होतं, असही ते म्हणाले.

किरकोळ मतभेद मिटावे

किरकोळ मतभेद मिटले पाहिजे हे तुम्हाला वाटत होतं. आपल्या पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात जाणं हे त्यांना पटलं असावं, म्हणून ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते, असा दावाही त्यांनी केला.

खोट्या सहानुभूतीचा प्रयत्न

खोट्या सहानभूतीसाठी उद्धव ठाकरे आता बोलत आहेत. त्यांनी खोट्या सहानुभूतीसाठी खटाटोप करू नका. तुमच्यासाठी मी मोठा प्रयत्न केला. तुम्ही जे कबूल केलं ते का अमंलात आणलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भेटल्यानंतर तुमचं मन का बदललं? हे सांगा, असा सवाल त्यांनी केला.

मगच गद्दार म्हणा

मी देवभक्त आहे. पहिली चादर मी साईबाबांना चादर घातली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीद व्हावे म्हणून चादर घातली. हे आमचं प्रेम होतं. भावना होती. तुम्ही आम्हाला गद्दार कसे म्हणता? आम्हाला गद्दार म्हणायचं असेल तर आधी सत्य लोकांना सांगा. मगच गद्दार म्हणा, असंही ते म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.