तर उद्धव ठाकरे यांचं सरकार आठ दिवसही टिकलं नसतं, सुनील तटकरे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; नेमकं काय म्हणाले?

Sunil Tatkare On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचे सरकार त्यावेळी आठ दिवसही टिकलं नसतं. अजितदादा पवार यांच्या या भूमिकेमुळे काय घडलं आणि काय झालं, याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, काय म्हणाले सुनील तटकरे...

तर उद्धव ठाकरे यांचं सरकार आठ दिवसही टिकलं नसतं, सुनील तटकरे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 11:53 AM

मुंबई | 1 March 2024 : महायुत्तीत रायगडच्या जागेवरुन धुसफूस सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी त्यांच्या माजी सहकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर महाविकास आघाडीचं सरकार आठ दिवसही टिकलं नसतं. मी हा दावा व्यासपीठावर करतो. मी सांगतो. कारण आमदारांच्या मनात दादांचा निर्णय योग्य होता. तीन पक्षाच्या सरकार पेक्षा दोन पक्षाचं सरकार हवं होतं. दादा आणि देवेंद्र जींचं सरकार चांगलं ठरलं असतं हे आमदारांना वाटत होतं. सर्वोच्च न्यायालयाचा हेडकाऊंटचा निर्णय आला नसता तर निकाल वेगळा लागला असता. परिस्थिती वेगळी झाली असती. दादांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर आमदारांच्या मनातील स्फोट झाला असता, असा दावा तटकरे यांनी केला.

ती काही मेहरबानी नव्हती

  • त्यावेळी ठाकरे सरकार स्थापना करताना काय घडामोडी घडल्या याची उकल तटकरे यांनी केली. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं ही मेहरबानी नव्हती. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर महाविकास आघाडीचं सरकार आठ दिवसही टिकलं नसतं. मी हा दावा व्यासपीठावर करतो. मी सांगतो. कारण आमदारांच्या मनात दादांचा निर्णय योग्य होता. तीन पक्षाच्या सरकार पेक्षा दोन पक्षाचं सरकार हवं होतं. दादा आणि देवेंद्र जींचं सरकार चांगलं ठरलं असतं हे आमदारांना वाटत होतं.
  • सर्वोच्च न्यायालयाचा हेडकाऊंटचा निर्णय आला नसता तर निकाल वेगळा लागला असता. परिस्थिती वेगळी झाली असती. दादांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर आमदारांच्या मनातील स्फोट झाला असता. मनी बिल आल्यावर गुप्त मतदान होतं. अशावेळी काहीही घडलं असतं. जे घडतंय ते ओळखून अजितदादांची गरज ओळखून पक्षनेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्री केलं. अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं ही कुणाची मेहरबानी नव्हती. पक्षाच्या अस्तित्वासाठीचा तो निर्णय होता, असे ते म्हणाले.

काळ उत्तर देईल

हे सुद्धा वाचा

पहाटेची शपथ नव्हीत. ती ८ वाजेची शपथ होती. लख्ख प्रकाशात झाली. काळाच्या ओघात त्याची उत्तरे मिळतील. काळ हेच उत्तर आहे. रहस्य तसंच राहणार. कुटुंबात काय चर्चा झाली हे माहीत नाही. हल्ली लोक फार मोठं समजण्याच्या नावाखाली काहीही बोलतात, असा टोला तटकरे यांनी लगावला.

कर्तृत्व सिद्ध करावं लागतं

पद मिळाल्यामुळे अजितदादा इथवर पोहोचले, असं म्हटलं जातं. पण टेक ऑफ करताना काही तरी लागतं. पण नंतर कर्तृत्व सिद्ध कराव लागतं. 53 पैकी 43 आमदार सोबत येतात हे कर्तृत्व आहे, म्हणूनच आले. त्यांचा विश्वास आहे म्हणूनच आले. त्यांनी असामान्य भूमिका घेतली, म्हणूनच त्यांच्यासोबत गेले अशी त्यांनी दादांची पाठराखण केली.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.