“हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व”; उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वावरून विरोधकांना ठणकावले…
हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे राष्ट्र प्रथम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हिंदुत्वाचा बुरखा घालून कोणी राष्ट्र गिळायला निघाला असेल तर कडवट राष्ट्रवादी राष्ट्रीय हिंदू म्हणून जे या विचाराचे आहेत
मुंबईः शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकऱे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर घणाघात केला. चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू असल्याचे सांगत त्यांनी हिंदूत्वाची री पुन्हा ओढत. राज्यातील विरोधकांसह केंद्र सरकारवर जोरदार हल्ला बोल केला. उद्धव ठाकरे यांनी कालही हिंदुत्वाच्या मुद्याला हात घालत आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्वाला सोडले नाही असं स्पष्ट मत त्यांनी काल मांडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून जे राष्ट्रीय हिंदू आहेत असं वाटतं त्यांना आता लढाईला उभा राहिले पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्या ते अधोरेखित करत आहे. आम्ही हिंदूत्व सोडलं नाही आणि सोडणारही नाही.
हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे राष्ट्र प्रथम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हिंदुत्वाचा बुरखा घालून कोणी राष्ट्र गिळायला निघाला असेल तर कडवट राष्ट्रवादी राष्ट्रीय हिंदू म्हणून जे या विचाराचे आहेत त्यांनी लढाईला आता उभं राहिलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला आहे. तो चुकीचा असल्याचे सांगत. त्यावर ज्या ज्या लोकांना निवडले गेले आहेत.
त्यातील एक व्यक्ती वादग्रस्त असल्याचे सांगत त्यांनी प्रशांत भूषण यांनी केलेल्या तक्रारीचाही दाखला दिला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व हे फक्त मर्यादित न घेता त्यांनी ऱाष्ट्रीय हिंदूत्वाचा मुद्या उपस्थित करून भाजपलाच डिवचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय हिंदुत्वाचा प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले की ज्यांना राष्ट्रवादी वाटते. राष्ट्रवादीचा प्रश्र त्यांनी उपस्थित केल्यानंतर याचा संबंध शरद पवारांबरोबर कुणीही जोडू नये असंही त्यांनी यावेली सांगितले. हिंदुत्व आणि निवडणूक आयोगावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.