विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे शिवसेनेची ‘फिल्डिंग’? विधिमंडळ सचिवांच्या भेटीने चर्चांना उधाण, नियम सांगतो काय?

Udhav Thackeray Shivsena Opposition Leader : महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत झोर का झटका लागला. आता विरोधी पक्षनेते पद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाला हे पद मिळणार नसल्याचे नियमांकडे बोट करून सांगण्यात येत असले तरी उद्धव सेनेने त्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे शिवसेनेची 'फिल्डिंग'? विधिमंडळ सचिवांच्या भेटीने चर्चांना उधाण, नियम सांगतो काय?
विरोधी पक्षनेते पदी कोण?
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 10:09 AM

विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री कोण ही चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते पदी कुणाची वर्णी लागणार याविषयीची उत्सुकता आहे. कारण यावेळी नियमांकडे बोट दाखवून महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला हे पद मिळणार नसल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने पक्षाचे विधिमंडळ गटनेते निवडल्यानंतर आता उद्धव सेनेने सुद्धा गटनेतेपदाची निवड केली आहे. आता उद्धव सेनेने विरोधी पक्षनेते पदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विधिमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव

काल उद्धव सेनेच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक झाली. या बैठकीत भास्कर जाधव यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. तर सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा प्रतोदपदी निुयक्ती करण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर सभागृह नेता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर उद्धव सेना आमदारांच्या शिष्टमंडळाने विधिमंडळ सचिवांची भेट घेतली. या नवीन निवडीबाबतचे पत्र त्यांनी सचिवांना भेट देऊन दिले.

हे सुद्धा वाचा

विरोधी पक्षनेते पदासाठी फिल्डिंग?

उद्धव सेनेचे विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव यांनी या भेटीची माहिती दिली. त्यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी काय नियम आहे, त्याचे निकष काय? याविषयीची सचिवांसोबत चर्चा केल्याची माहिती दिली. या पदासाठी किती संख्याबळ पुरेसे आहे. त्याचा नियम काय? कायदा काय सांगतो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या प्रश्नांवर सचिवांचा गोंधळ उडाल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला. एका नियमानुसार, विरोधी पक्षनेतेपदासाठी 29 आमदारांचं संख्याबळ लागत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर बोलताना आमच्याकडे सध्या 20 आमदार आहेत. महाविकास आघाडीत आपल्याकडेच संख्याबळ जास्त असल्याचे ते म्हणाले. आता विरोधी पक्ष नेतेपदासाठी काय नियम आहे, काय प्रक्रिया आहे, यावर सविस्तर चर्चा करू असे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत. पण याविषयीचा नियम काय आहे, कायदा काय आहे आणि संख्याबळानुसार या नियमात काही बदल संभवतो का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाही. त्याविषयी आता उद्धव सेने मंथन करत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा विरोधी पक्षांना योग्य सन्मान देण्याची भाषा करण्यात आली आहे. त्यामुळे या पदावर उद्धव सेनेचा शिलेदार बसणार का हे लवकरच समोर येईल.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.