“उलट चोर कोतवाल को डांटे”, निर्भया निधीची वस्तूस्थिती मांडत विरोधकांवर सत्ताधाऱ्यांचा पलटवार

महाविकास आघाडीचे सरकार असताना 220 वाहनं मिळाली होती. त्यानंतर त्यांनी 121 वाहनं ही 94 पोलीस स्थानकांना देण्यात आली. तर 99 वाहनं मात्र इतर विभागाना वाटण्यात आली.

उलट चोर कोतवाल को डांटे, निर्भया निधीची वस्तूस्थिती मांडत विरोधकांवर सत्ताधाऱ्यांचा पलटवार
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 8:15 PM

मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून निर्भया पथकातील वाहनांवरून राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेली वाहनं स्वतःसाठी वापरली असल्याटी टीका आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांनी केली. त्यानंतर आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सगळी वस्तूस्थिती मांडत महाविकास आघाडी सरकारची पोलखोल केली. त्यावेळी सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना तुमच्या सुरक्षिततेच्या ताफ्यातील वाहनही हे निर्भया पथकातील होती असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे.

यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना, त्यांनी उलटा चोर, कोतवाल को डांटे म्हणत महाविकास आघाडीवरच त्यांनी पलटवार केला आहे.

निर्भया पथकातील वाहनांचा तपशील देताना त्यांनी केंद्र सरकारकडून किती वाहनं मिळाली आणि निर्भया पथकासाठी त्यातील किती वापरण्यात आली त्याची त्यांनी आकडेवारीच मांडली.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितली की, निर्भया पथकासाठी म्हणजेच महिलांसाठी आणि मुलींसाठी ही वाहनं केंद्रककडून मिळाली.

महाविकास आघाडीचे सरकार असताना 220 वाहनं मिळाली होती. त्यानंतर त्यांनी 121 वाहनं ही 94 पोलीस स्थानकांना देण्यात आली. तर 99 वाहनं मात्र इतर विभागाना वाटण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातच ही वाहनांचे वाटप करण्यात आली. मात्र आता शिंदे सरकारवर टीका केली जात आहे.

जे लोकप्रतिनिधी निर्भया पथकातील वाहनांवरून टीका करत आहेत. त्यांच्याच सुरक्षिततेच्या पथकातील वाहनांसाठी निर्भया पथकातील वाहनं वापरली होती हेही टीका करणारे विसरतात अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात 4 फेब्रुवारी 2022 रोजी निर्भया पथकासठी वाहन खरेदी करण्यासाठीच्या निधीतून 220 वाहनं खरेदी करण्यात आली.

मात्र त्या वाहनांची योग्य पद्धतीने वाटप न करता त्या काळातील एकाच मंत्र्यांच्या मतदार संघात काही वाहनं देण्यात आली. त्यामुळे आता शिंदे सरकारच्या विरोधात कांगावा का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ज्या नेत्यांकडून ही टीका केली जात आहे. त्याच नेत्यांच्या ताफ्यामध्ये ही वाहनं वापरली होती, मात्र आता ती वाहनं काढून घेऊन निर्भया पथकासाठी आता देण्यात येणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

छगन भुजबळ, विजय वडेटीवार, सुनील केदार, सुनील तटकरे, सुभाष देसाई यांच्या ताफ्यातील व्हीव्हीआयपी ताफ्यासाठीही वापरण्यात आली होती.

त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या महिलांची वाहनं स्वतःच्या दावणीला बांधताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असा सवाल त्यांनी मविआतील नेत्यांना त्यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी.
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा...
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा....
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.