“पुण्याला येऊन मी बारा वाजवेन”; अजित पवार यांना भाजप नेत्याचा थेट इशारा…

ज्या ज्या लोकांनी शिवसेना फोडण्याचं काम केलं, त्यांना जनतेनं पराभूत केले आहे. नारायण राणे यांना तर दोन वेळा पराभूत केलं. एकदा तर महिलेनं त्यांचा पराभूत केला असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

पुण्याला येऊन मी बारा वाजवेन; अजित पवार यांना भाजप नेत्याचा थेट इशारा...
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 5:54 PM

मुंबईः राज्यातील कसबा पोटनिवडणुकीवरून आता राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यातच आता या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं नारायण राणे आणि अजित पवार यांचा वाद शिगेला पोहचला आहे. काल अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना जे जे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. ते ते नेते पराभूत झाले आहेत. नारायण राणे तर दोन वेळा पराभूत झाले आहेत. एकदा कोकणात तर आणि एकदा मुंबईतून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा हा पराभव एका महिलेनं केला आहे असा टोलाही अजित पवार यांनी त्यांना लगावला होता.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची ही टीका नारायण राणे यांच्या जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी अजित पवार यांना बारामतीच्या बाहेरच किती कळतं माहिती नाही मात्र त्यांनी माझ्या नादाला लागू नये नाही तर बारामतीत येऊन मी बारा वाजवणार असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना त्यांना एका महिलेनं पाडलं असं म्हणत आणि एकदा नाही दोनदा त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं असा जोरदार हल्लाबोल त्यांच्या्वर करण्यात आला होता.

त्यामुळे चिडलेल्या नारायण राणे यांनी अजित पवार यांना किती कळतं असं म्हणत त्यांना बारामतीबाहेरचं त्यांना काही माहिती नाही असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

मी वांद्र्यात पराभूत झाला असला तरी तो माझा मतदार संघ नव्हता, माझं कार्यक्षेत्र हे मुंबई आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणात पाठवले.

त्यानंतर मी कोकणातून एकदा नाही तर सहा वेळा निवडून आलो अशी माहितीही त्यांनी अजित पवार यांना दिली आहे. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका नाही तर मी बारा वाजवणार असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.