तो थेट विधान परिषदेत शिरला, आमदारांच्या जागेवर बसला, सभागृहात अनोळखी व्यक्तीचा प्रवेश

महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण महाराष्ट्रातील सर्वोच्च सभागृहात आज अतिशय विचित्र प्रकार बघायला मिळालाय.

तो थेट विधान परिषदेत शिरला, आमदारांच्या जागेवर बसला, सभागृहात अनोळखी व्यक्तीचा प्रवेश
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 10:19 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत असलेलं विधान भवन ही वास्तू सर्वात जास्त महत्त्वाची आहे. कारण या वास्तूमधून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, नोकरदार, व्यावसायिक, गरीब आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. याच विधान भवनातून महाराष्ट्राचा विकास कसा होईल? यासाठी ठराव मांडले जातात. याच वास्तूमधून महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे कायदे तयार केले जातात. महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी याच विधान भवनातून बसून जनतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतात. अशा या अतिशय महत्त्वाच्या वास्तूमधील आज एक अतिशय बेजबाबदार आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. विधान भवनात एक अनोळखी इसम आला. हा इसम फक्त विधान भवन परिसरात न थांबता थेट विधान परिषदेत शिरल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी विधान परिषदेचं कामकाज सुरु असताना एक ते अडीच वाजेच्या सुमारास निळा रंगाचा शर्ट घातलेला लाल रंगाचा टिका लावलेला एक अनोळखी इसम सभागृहात बसला. यावेळी उपस्थित आमदारांमध्ये संशयाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. हा व्यक्ती नेमका कोण? असा प्रश्न आमदारांना पडला. विशेष म्हणजे अनेक आमदारांनी या व्यक्तीच्या उपस्थितीवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित प्रकारामुळे विधान भवनातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे विधान भवन परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. विधान भवन परिसरात टॉपच्या सुरक्षा यंत्रणा कामाला लागलेली असतात. विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज जवळून पाहण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना देखील आतमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पासची आवश्यकता असते. फक्त पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर आतमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी पास आवश्यक असतो. असं असताना आज विधान परिषदेत अचानक एखादी व्यक्ती शिरल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.