Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात दिवसभरात काय घडलं, पाहा व्हिडीओ

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने खळबळ उडालेली पाहायल मिळाली. या संपूर्ण प्रकरणाचा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट पाहा.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात दिवसभरात काय घडलं, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 10:11 PM

मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या गोळीबारावरुन राजकीय फैरी झडतायत. हे दोन व्यक्तींचं भांडण नसून शिंदे-फडणवीस सरकारमधलं गँगवॉर असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरुन विरोधक सरकारला घेरतायत. भाजप आमदारानंच शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्यानं हा वाद दोघांमधला नव्हे, तर सरकारमधल्या गँगवॉरचा असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.

भाजपचे आमदार गणपत गायकवाडांनी गोळीबारानंतर जी प्रतिक्रिया दिली, त्यावरुन विरोधक सरकारविरोधात आक्रमक झालेत. भाजपचे आमदार गायकवाडांनी म्हटलंय की, मीच गोळी झाडली, मला काहीही पश्चाताप नाही. माझ्या जागेचा या लोकांनी ताबा घेतला. पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवलं.

मी वरिष्ठांना अनेकदा तक्रार केली होती. माझा निधी वापरुन काम झालं की श्रीकांत शिंदे हे स्वतः ते काम केल्याचे बोर्ड लावतात. दादागिरी करुन हे होतं आहे. शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांशी गद्दारी केली आता ते बीजेपीसोबतही गद्दारी करणार आहेत. एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यवधी रुपये बाकी आहेत. शिंदे साहेब देवाला मानत असतील तर त्यांनी देवाची शपथ घेऊन सांगावं की माझे किती पैसे बाकी आहेत.

दरम्यान आमदार गणपत गायकवाडांसह 7 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेलाय आणि पोलीस स्टेशनबाहेर काय घडलं., त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. या सीसीटीव्हीत समोर येणारी जी लोकं आहेत, त्यात भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या मुलासह त्यांचे समर्थक आहेत. तर इकडे या बाजूला शिंदे गटाच्या महेश गायकवाडांचे समर्थक होते. याचवेळी आतमध्ये महेश गायकवाड त्यांचे साथीदार आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड बसले होते. बाहेर या दोन्ही गटांमध्ये काहीतरी बाचाबाची होती., धक्काबुक्की होऊ लागते. त्याच दरम्यान पीआय बाहेर येतात. दोन्ही गटाला समजावतात. मात्र दुसरीकडे त्याचवेळी गणपत गायकवाड शिंदेंच्या महेश गायकवाडांच्या समोर आले. कमरेला कोसलेलं पिस्तुल काढलं आणि समोर बसलेल्या महेश गायकवाडांवर गोळीबार केला.

शिंदे गटाचे महेश गायकवाडांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. त्यांना कुठे-कुठे गोळ्या लागल्या त्याचा एक्स रे समोर आलाय. गोळ्या काढल्या गेल्या असल्या तरी ते अद्याप व्हेटिंलेटरवर आहेत. एका जमिनीच्या वादावरुन, हा रक्तरंजित थरार रंगलाय.. ठाण्याच्या हद्दीतील द्वारली गावात 10 वर्षांपूर्वी गणपत गायकवाडांनी 50 गुंठे जमीन खरेदी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ जाधवांकडून गायकवाडांनी खरेदी केलेली जमीन ही वतनाची होती. जमिनीचा वाद कोर्टातही गेला आणि कोर्टाच्या आदेशानुसार आमदार गायकवाडांच्या कंपनीच्या नावावर 7/12 झाला. मात्र 3 दिवसांआधी गणपत गायकवाड हे काही विकासकांना घेऊन द्वारली गावात आले, त्यावेळी काही गावकऱ्यांनीही त्यांना विरोध केला.

त्याचवेळी शिंदे गटाचे महेश गायकवाडांनी सुरक्षा भिंत तोडून जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाडांचा आहे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर 400-500 समर्थकांना घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मुलगा वैभवला धक्काबुकी केल्याचा आरोप गणपत गायकवाडांनी केला. यासोबतच कल्याणमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत कायमच खटके उघड आलेले आहेत. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातला वादही जुनाच आहे.

या प्रकरणात पुढे काय होईल., याची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र पोलीस ठाण्यातच सत्ताधारी आमदारांनी केलेल्या गोळीबारानं महाराष्ट्रातल्या कायदा-सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली गेलीयत. उल्हासनगरमधल्या घटनांवरुन सोशल मीडियातही अनेक चर्चा रंगतायत. ज्यात काहींनी म्हटलंय की, घटना घडली मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गोळीबार झाला उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या मारल्या गेल्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या माणसावर गोळीबार केला उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या माणसानं गोळी लागलेल्यांचे समर्थक म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातला आमदार गुंडगिरी करत होता. गोळीबार करणारे भाजपचे आमदार म्हणतात की, मला मुख्यमंत्र्यांमुळे गुंड व्हावं लागलं.

उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातले प्रदेशाध्यक्ष म्हणतायत की, गायकवाडांच्या मते त्यांनी स्वसुरक्षेसाठी गोळीबार केला असावा. यावर मुख्यमंत्र्यांच्या पक्षातले खासदार म्हणतायत की काय घडलं, हे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतंय. या साऱ्यात दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत की याबद्दल गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाचे भुजबळ म्हणतायत की गोळीबार झाला यात फडणवीसांची चूक काय? तर काहींनी म्हटलंय की महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था इतकी कडक झालीय, की आता चक्क पोलीस स्टेशनमध्येही बंदोबस्त लावण्याची वेळ आलीय

चूक कोण, बरोबर कोण याचा फैसला कोर्टात होणाराय. मात्र जमिनीचा वाद-मारहाण आणि धक्काबुक्कीवरुन जर सत्ताधारी आमदारच पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडणार असतील, तर मग कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलाय का, या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.