‘तुमची हकालपट्टी का करू नये?’; पूजा खेडकरांविरोधात UPSC ॲक्शन मोडमध्ये, FIR दाखल

| Updated on: Jul 19, 2024 | 6:55 PM

UPSC Action mode IAS Officer Pooja Khedkar Case : पूजा खेडकर प्रकरणात आता यूपीएससी अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पूजा खेडकरांविरोधात यूपीएससने एफआयआर दाखल केला आहे. नेमके काय आरोप केलेत जाणून घ्या.

तुमची हकालपट्टी का करू नये?; पूजा खेडकरांविरोधात UPSC ॲक्शन मोडमध्ये, FIR दाखल
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. यूपीएससीने या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं आहे. पूजा खेडकरांविरोधात अॅक्शन मोडमध्ये आलीय. पूजा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यासोबतच पूजा खेडकरला कारणे द्या नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये तुमची हकालपट्टी का करू नये? असं विचारलं आहे. यूपीएससीने एफआयआर दाखल केलाय त्यामध्ये पूजा खेडकर यांच्यावर कोणते आरोप केलेत जाणून घ्या.

पूजा मनोरमा दिलीप खेडकरच्या प्रकरणाचा सर्व तपास केला आहे. या प्रकरणामध्ये पूजा खेडकरने स्वत:सह आई आणि वडिलांचे नाव, फोटो, सही, ई-मेल, मोबाईल नंबर आणि पत्ता हे सर्व बदलून ओळख लपवल्याचं समोक आलं आहे. यूपीएसीने यावर नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या.

यूपीएससीने पूजावर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये एफआयआर दाखल केला आहे. तसेच पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यामध्ये भविष्यातील परीक्षांसाठी बंदी आणि निवड रद्द करणे यांचा समावेश आहे. UPSC घटनात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करतं. UPSC ने सर्व परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य आणि अखंडता निष्पक्षतेने आणि नियमांचे काटेकोर पालन करून राखली आहे. UPSC वर उमेदवारांचा विश्वास आहे. उमेदवारांचा हा आत्मविश्वास अबाधित राहील आणि तडजोड होणार नाही याची खात्री करण्यासाठी आयोग बांधील आहे, असं यूपीएससीने म्हटलं आहे.

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 20 जुलैपर्यंत त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मनोरमा खेडकर यांच्याशी निगडीत असलेल्या इंजिनिअरींग कंपनीला सील केलं गेलं आहे.

कर न भरल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘थर्मोवेरिटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला सील केलं आहे. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीच्या पत्त्यावर पूजा खेडकर यांनी अपंगत्त्व प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना हा घरचा पत्ता असल्याचं दाखवलं होतं. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांनी हा अर्ज केलेला.