‘हिंमत ए मर्दा मदद ए खुदा’, 29 मुस्लिम तरुणांची UPSC परीक्षेत बाजी

| Updated on: May 24, 2023 | 2:59 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. या निकालात अल्पसंख्याक, मुस्लिम तरुणांनी देखील चांगलीच बाजी मारली आहे. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या 29 मुस्लिम तरुण-तरुणींची यादी समोर आली आहे.

हिंमत ए मर्दा मदद ए खुदा, 29 मुस्लिम तरुणांची UPSC परीक्षेत बाजी
Image Credit source: google
Follow us on

मुंबई : ‘हिंमत ए मर्दा मदद ए खुदा’! ही म्हण आपण ऐकली असेल. या म्हणीचा अर्थ असा की, आपली काम करण्याची इच्छा असली पाहिजे. आपण कोणत्याही परिस्थितीत संघर्ष केला पाहिजे. कोणत्या परीक्षेच्या काळात प्रचंड जिद्दीने काम केलं पाहिजे. विशेष म्हणजे आपण झोकून देवून काम केलं तर आपल्याला यश मिळवण्यासाठी खुदाही (देव) मदत करतो. हे सगळं सांगण्याचं कारणही अगदी तसंच आहे. कारण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 च्या निकालात 29 मुस्लिम तरुण-तरुणींना यश मिळालं आहे. हे खरंच इतकं सोपं नाहीय. या परीक्षेत देशात सातव्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेला वसीम अहमद भट हा काश्मीरचा आहे. त्याच्यासह आणखी 28 अल्पसंख्याक समूदायाच्या उमेदवारांनी यूपीएससीच्या परीक्षेत बाजी मारलीय.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. या निकालात अल्पसंख्याक, मुस्लिम तरुणांनी देखील चांगलीच बाजी मारली आहे. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या 29 मुस्लिम तरुण-तरुणींची यादी समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या वसीम अहमद भट या तरुणाने यूपीएससी परीक्षेत सातवा क्रमांक पटकवलाय. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामागील कारणही तसंच आहे. यूपीएससीची परीक्षा पास होणं सोपं नाही. विशेष म्हणजे अल्पसंख्याक समुदायतून पुढे येवून यूपीएससी क्रॅक करणं हे मोठं आव्हानात्मक असतं.

वसीम हा तरुण तर काश्मीरमध्ये अतिशय संवेदशील परिसरात वास्तव्यास आहे. तिथे अतिरेक्यांच्या सातत्याने कारवाया सुरु असतात. पण तरीही वसीमने निडरपणे अभ्यासात लक्ष दिलं आणि आज देशात तो सातवा आला. त्यामुळे त्याचं विशेष कौतुक होत आहे.

वाचा यादी

1) वसीम अहमद भट (देशात 7 वा नंबर)

2) नावीद भट (देशात 84 वा नंबर)

3) असद झुबर (86 वा रँक)

4) आमीर खान (154 वा रँक)

5) रुहानी (159 वा रँक)

6) आयशा फातिमा (184 वा रँक)

7) शेख हबीबुल्ला (189 वा रँक)

8) झुफिशान हक (193 वा रँक)

9) मनन भट (231 वा रँक)

10) आकीप खान (268 वा रँक)

11) मोईन अहमद (296 वा रँक)

12) मोहम्मद इदुल अहमद (298 वा रँक)

13) अर्शद मोहम्मद (350 वा रँक)

14) रशिदा खातून (354 वा रँक)

15) आयमान रिझवान (398 वा रँक)

16) मोहम्मद रिसविन (441 वा रँक)

17) मोहम्मद इरफान (476 वा रँक)

18) सय्यद मोहम्मद हुसेन (570 वा रँक)

19) काझी आयशा इब्राहिम (AIR-586 वा रँक)

20) मोहम्मद अफझेल (599 वा रँक)

21) एस मोहम्मद याकूब (612 वा रँक)

22) मोहम्मद शादा (642 वा रँक)

23) तस्कीन खान (736 वा रँक)

24) मोहम्मद सिद्दीक शरीफ (745 वा रँक)

25) अखिला बी एस (760 वा रँक)

26) मो. बुरहान जमान (768 वा रँक)

27) फातिमा हारिस (74 वा रँक)

28) इराम चौधरी (852 वा रँक)

29) शेरीन शहाना टी के (913 वा रँक)