Special Report : ऊर्फी जावेद महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटली, आयोग चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करणार काय?
चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रियांची माहिती ऊर्फीने महिला आयोगाच्या अध्यक्षांना दिली. ट्वीटर आणि मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ धमकी देत असल्याचं ऊर्फीने आयोगाला सांगितलं.
मुंबई : ऊर्फी जावेदचा (Urfi Javed) हा नागडा नाच चालू देणार नाही, असा इशारा भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिला. दम आहे तितका लावा. कारवाई करा, असंही त्यांनी म्हटलं होतं. चित्रा वाघ यांनी ऊर्फीला घेरल्यानंतर प्रकरण महिला आयोगात पोहचलं. आधी वकील नितीन सातपुते महिला आयोगात आले. नंतर ऊर्फी जावेद महिला आयोगाच्या कार्यालयात आल्या. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास रुपाली चाकणकर आणि ऊर्फी जावेद यांच्यात चर्चा झाली.
ऊर्फी जावेद कार्यालयाबाहेर पडली. पण, तिनं माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. महिला आयोगात येऊनही ऊर्फीनं चित्रा वाघ यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली नाही.
वाघ धमकी देत असल्याची तक्रार
चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रियांची माहिती ऊर्फीने महिला आयोगाच्या अध्यक्षांना दिली. ट्वीटर आणि मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ धमकी देत असल्याचं ऊर्फीने आयोगाला सांगितलं.
ऊर्फी लवकरच महिला आयोगाकडे ऑनलाऊन तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऊर्फीला काही दिवसांत धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळं तिला असुरक्षित वाटते, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
लेखी तक्रारीनंतर कारवाई
जीवाला धोका आहे, अशी तक्रार ऊर्फीने महिला आयोगाला दिली. पण, लेखी तक्राेर आल्यानंतर त्यावर पुढील कारवाई केली जाईल, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
चित्रा वाघ यांनी पुन्हा ऊर्फी जावेदवर डरकाडी फोडली आहे. ती प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी चिंद्या लावून फिरतेय. भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी हे तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.
वकील म्हणतात, ऊर्फीच्या जीवाला धोका
आज आवाज उठविला नाही, तर हा नंगा नाच अख्या महाराष्ट्रात दिसेल. आमची ही संस्कृती नाही. आम्ही हे फॅशनच्या नावाखाली चालू देणार नाही, असंही चित्रा वाघ यांनी ठणकावलं.
ऊर्फी जावेद ही मॉडल आहे. ती अभिनेत्री आहे. राहण्याची स्टाईल तिच्या आवडीप्रमाणे करते. त्यात अश्लील असं काही नाही. चित्रा वाघ यांनी तिच्याबद्दल अपशब्द उच्चारले. जिथं मिळेल, तिथ थोबडवेल, अशी धमकी दिली. त्यामुळं ऊर्फीच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं वकीलांनी म्हटलंय.