“कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय, संभाव्य धोका पाहता लसीकरणाचा वेग वाढवा”
कोरोना लाटेची तीव्रता कमी करणं सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे. कोरोनाचे नियम पाळत असताना लसीकरणचा वेग वाढवणं देखील गरजेचं असल्याचं मत डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलं.
मुंबई : देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका सांगितला जात आहे. तसा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करु लागले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी ही लाट कशी कमी करायची हे आपल्या हातात आहे. यासाठी लसीकरण आणि शासनाने घालून दिलेले कोरोना नियम पाळले तर तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल, असं मत कोरोना विरोधी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलंय.
कोरोना लाटेची तीव्रता कमी करणं सर्वस्वी नागरिकांच्या हातात
कोरोना लाटेची तीव्रता कमी करणं सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे. कोरोनाचे नियम पाळत असताना लसीकरणचा वेग वाढवणं देखील गरजेचं असल्याचं मत डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलं. तिसरी रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे, असंही त्यांनी यावेळी आवर्जुन नमूद केलं.
मुंबईत आणि राज्यात लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे
केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. परदेशात डेल्टा वाढत आहे. तिकडे तिसरी लाट आली असली तरी मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने रुग्णांना त्रास कमी होत आहे. लसीकरण हे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यास मदत करेल, मुंबईत किंवा राज्यात आता लसीकरणचा वेग वाढला पाहिजे, असंही ते म्हणाले.
लसीकरण न झाल्यास डेल्टा व्हेरिएंट घातक
सध्या लसीचा पुरवठा सुयोग्य होत नाही, त्यामुळे लसीकरणात खंड पडतो आहे. परंतु अशा परिस्थितीत डेल्टा सर्व देशांत पसरत असताना तो महाराष्ट्रात देखील पसरतो आहे. त्यासाठी लसीकरण लवकर व्हायला हवं, लसीकरण न झाल्यास तो घातक ठरेल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डेल्टा हा कांजण्याप्रमाणे परिणाम करतोय
डेल्टा हा कांजण्याप्रमाणे परिणाम करत आहेत. डेल्टाचा आतापर्यंत 132 देशांत प्रादुर्भाव झाला आहे. तर डेल्टा व्हेरिएंटचे जगभरात 40 लाख रुग्ण आहेत. परिस्थिती बिघडण्यापूर्वी डेल्टा संसर्ग रोखावा, त्यासाठी सध्या तरी लसीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचं जागतिक आरोग्य परिषदेने म्हटलं आहे.
(Vaccination is the only way to prevent a third wave of corona Says DR Rahul pandit)
हे ही वाचा :