आमचे मतभेद काय झालेत सर्वांसमोर सांगणार, वैजनाथ वाघमारे यांचा सुषमा अंधारे यांना इशारा
सुषमा अंधारे तोफ वैगेरे असं काही नाही. घडविणारा मीच आहे, असंही वैजनाथ वाघमारे यांचं म्हणणंय.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या पाठोपाठ त्यांचे पतीही राजकारणात आले. सुषमा अंधारे या ठाकरे गटात आहेत. तर अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात आलेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून अंधारे आणि त्यांचे पती विभक्त आहेत. आमचे मतभेद काय झालेत, हे आता सर्वांसमोर सांगणार, असं अंधारे यांच्या पतीनं वैजनाथ वाघमारे यांनी म्हंटलंय.
शिवसेना फुटीनंतर काल वडील एक गटात आणि मुलगा दुसऱ्या गटात. वडील गजानन किर्तीकर हे शिंदे गटात, तर मुलगा अमोल किर्तीकर हे युवासेना पदाधिकारी आहेत. आज या गटातटाच्या राजकारणाची धग पती-पत्नीपर्यंत येऊन पोहचली. वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात गेलेत. आगामी काळात आमच्यातले मतभेद कसे विकोपाला गेले, हे सांगणार असल्याचं ते म्हणाले.
एक नाव सोडून दुसरं नाव जोडलं गेलं का. माझं खच्चीकरण का होईल, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. एकेकाळी जोडला गेलेला माणूस. त्यांच्यापासून मी गेल्या काही वर्षांपासून विभक्त राहते. त्यांच्या कुठं जाण्या-येण्यानं माझ्या आयुष्यावर परिणाम होतो, असं मी का मानावं, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
सुषमा अंधारे तोफ वैगेरे असं काही नाही. घडविणारा मीच आहे, असंही वैजनाथ वाघमारे यांचं म्हणणंय. मला घडवलं वैगेरे म्हणत असतील, तर पब्लिक डोमेनमध्ये एखादा तरी फोटो दिसला असता की ते माझ्यासोबत आलेले आहेत, असंही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं. माझ्या लेकीच्या वाढदिवसाचा केक कटिंगचा एक फोटो सोडला तर ते कुठंचं दिसत नाहीत.